वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेवेतुन सन २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना अनुदान
अभावी सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यात आले नव्हते. प्रलंबित राहीलेली रक्कम प्राप्त करण्याबाबत
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु व नियंत्रक श्री आप्पासाहेब
चाटे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे शासनाकडुन रू २२.५९ कोटी मंजुर करून विद्यापीठास प्राप्त झाले. त्याअनुषंगाने सन २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या
अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या निवृत्ती अंशदान व उपदानाची रक्कम दि २० फेब्रुवारी रोजी कुलगुरू मा
डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते अदा करण्यात आली. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, नियंत्रक श्री आप्पासाहेब चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन श्री जी बी ऊबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री ना ज
सोनकांबळे, श्री चिंतारे, श्री सुर्यवंशी, श्री किशोर शिंदे, श्रीमती हवलदार, श्री
कदम यांनी परिश्रम घेतले.