Wednesday, February 11, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयाचा नृसिंह पोखर्णी येथे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व कृषि तंत्रजान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. ४ ते  ७ फेब्रुवारी दरम्‍यान नृसिंह पोखर्णी येथे शेतकरी महिलांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी आर्थिक सक्षमीकरण याविषयावर चार दिवसीय विनामूल्‍य प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाला. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्‍हाधिकाकरी मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला तर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी या प्रशिक्षणास शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. महिलांनी पैशांची बचत करणे व स्‍वत: अर्थाजन करुण कुटूंबाचे जीवनमान उंचावणे हा मुख्‍य उद्देश प्रशिक्षणाचा होता. प्रशिक्षणात मातांनी बालकांची काळजी घेणे, बांधणी तंत्र वापरुन कपडा रंगविण्‍याची कला, शेतकरी महिलांचे काबाडकष्‍ट कमी करण्‍याचे तंत्रज्ञान, पुष्‍पगुच्‍छ, पुष्‍पगालीचा तयार करणे, रिबनपासून बॅजेस तयार करणे इ. विषयी प्रात्‍यक्षीकासह मार्गदर्शन करण्‍यात आले. प्रशिक्षणात पन्‍नासचं शेतकरी महिलांनी नोंदणी करून त्‍यापेक्षा जास्‍त महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रात्‍यक्षिके देऊन माहिती दिल्‍यामुळे ज्ञान व कौशल्‍य वृध्दिंगत झाल्‍याचे मनोगत प्रशिक्षणार्थींनी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रशिक्षणाचे प्रशस्‍तीपत्र प्राचार्या प्रा. विशाला पटनम, सरपंच मदनराव वाघ, उपसरपंच शेषेराव वाघ यांच्‍या हस्‍ते वितरीत करण्‍यात आली. कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्या विशाला पटनम व श्री मारेाती चपळे प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) हे होते. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा.निता गायकवाड, डॉ.जयश्री झेंड, संगीता नाईक, रेश्‍मा शेख, मंजुषा रेवणवार आदींनी परिश्रम घेतले.