‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका सादर करतांना कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यी |
शिस्तबद्ध
लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली
राज्य उभे केले होते, सर्वसामान्याच्या कल्याणासाठी रयतेचे राज्य निर्माण करणारे ते
लोककल्याणकारी
राजे होते, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक
ढवन यांनी कृषी आभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित
कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी
अधिष्ठाता डॉ. उदय खोडके हे होते.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके अध्यक्षीय भाषणात
म्हणाले की, शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या
हितासाठी महत्वाचे कार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष्य
प्रा.विवेकानंद भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना पवार व राजेंद्र
पवार यांनी तर आभार प्रदर्शन नवनाथ घोडके यांनी केले.
प्रारंभीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि
शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अक्षय ढाकणे आणि उमेश
पवार यांनी स्वागतगीत तर प्रशांत अटकळ याने शिवगीत गायिले.
‘गड आला पण सिंह गेला’ ही एकांकिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली.
विद्यार्थी प्रतिनिधी गोविंद फुलारी, स्नेहा कांबळे, अजय सातपुते, जान्हवी जोशी,
देविका वल्खंडे, अश्विनी पवार, महेश लोंढे आणि विश्वास कदम यांनीही आपले विचार
मांडले. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या
जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास डॉ. स्मिता खोडके, प्रा.
हरीश आवारी, प्रा. मधुकर मोरे, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, प्रा. रवींद्र
शिंदे, प्रा. प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह महाविद्यालयातील
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.