Monday, June 29, 2015

कृषिदुत व कृषिकन्‍यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे........ प्राचार्य डॉ डि एन गोखले


ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करण्‍याची संधी कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना असुन कृषिदुत व कृषिकन्‍या यांनी शेतक-यांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महावि‍द्यालयाच्‍या कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावेअसतो. हा कार्यक्रम राबविण्‍यांसाठी कृषिदुत व कृषिकन्‍यांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ जुन रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते, व्‍यासपीठावर रावे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे, कोरडवाहु संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार, करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एस बी घुगे यांच्‍यासह विविध विषयतज्ञ उपस्थित होते.

प्राचार्य डॉ डि एन गोखले पुढे म्‍हणाले की, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण जीवनपध्‍दतीचा अभ्‍यास करावा व विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके, कृषि मेळावे आदींच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचवावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
कार्यक्रमात विषयतज्ञ डॉ अनिल धमक, प्रा ए बी बांगडे, प्रा ए एम कांबळे, प्रा रणजित चव्‍हाण, प्रा विशाल अवसरमल, प्रा पी एच घंटे, प्रा डि व्‍ही बैनवाड, प्रा भेदे यांनी विद्यार्थ्‍यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रावेचे समन्‍वयक डॉ राकेश आहिरे यांनी तर सुत्रसंचालन रावेचे प्रभारी अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले. या उद्बोधन कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ डि व्‍ही दळवी, डॉ आर सी महाजन, डॉ जयश्री एकाळे, प्रा ए आर मंत्री, प्रा सुनिता पवार, प्रा एस एस गलांडे, डॉ यु एन क-हाड यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्‍या मोठया संख्‍येने उपस्थित होते.  

कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) असुन या सत्रात प्रत्‍यक्ष शेतक-यांचे शेती कासण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवनपध्‍दतीचा ते अभ्‍यास करतात. या सत्रातील विद्यार्थ्‍यांना कृषिदुत व कृषिकन्‍या संबोधन्‍यात येते. यावर्षी कृषि महाविद्यालयातील १९२ विद्यार्थ्‍यी कृषिदुत व कृषिकन्‍या म्‍हणुन पुढील पंधरा आठवडे परभणी तालुक्‍यातील निवडक दहा गांवात कार्य करणार आहेत.