Saturday, October 3, 2015

औरंगाबाद जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा येथे प्रक्षेत्र दिन साजरावसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषि संशोधन प्रकल्‍प व मोदीपुरक (मेरत) येथील अखिल भारतीय एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोग योजनेतंर्गत दिनांक १ ऑक्‍टोंबर रोजी जि. औरंगाबाद जिल्‍ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा येथे प्रक्षेत्र दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमास मेरट येथील प्रमुख मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव, मुख्‍य कृषि विद्यावेत्‍ता डॉ. डब्‍ल्‍यु. एन. नारखेडे, फुलंब्रीचे तालुका कृषि अधिकारी श्री सोनवणे साहेब व मंडळ कृषि अधिकारी श्री नरके साहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव यांनी शेतक-यांना उपयुक्‍त मार्ग्‍दर्शन केले तर डॉ. नारखेडे यांनी एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन बद्दल माहिती दिली. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लाभार्थ्‍यांना मातीच्‍या आरोग्‍य पत्रिकेचे वाटप करण्‍यात आले. तालुका कृषि अधिकारी श्री सोनवणे साहेब यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषिविद्यावेत्‍ता डॉ. के. टी. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. देशपांडे श्री लोंढे, श्री शेख, श्री मुंढे, श्री डुकरे, श्री सुदेवाड, श्री योमे आदींनी परिश्रम घेतले.
  सदरिल योजनेंतर्गत एकात्मिक शेती पध्‍दतीचा भाग म्‍हणुन मका–हरभरा या पिकामधील संतुलीत अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाचे महत्‍व पटवुन देण्‍यासाठी सहा गावांत एकुण चोवीस शेतक-यांना हरभरा बियाणे व खताचे वाटप करण्‍यात येऊन दुग्‍ध्‍ उत्‍पादनासाठी गोधनांच्‍या आरोग्‍यासाठी क्षार मिश्रण मिनरल मिक्‍चर ३९ गोपालकांच्‍या समूहास देण्‍यात आले. तसेच मारवेल गवताचे वाटपही करण्‍यात आले.
  एकात्मिक शेती पध्‍दतीव्‍दारे शेतक-यांना विविध जोडधंद्याच्‍या माध्‍यमातुन बळकटी देऊन शेतीमधील संभाव्‍य नुकसानीची दाहकता कमी करता येऊ शकते, हे प्रत्‍यक्ष प्रयोगाच्‍या माध्‍यमातुन दर्शविण्‍यासाठी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदच्‍या शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोग योजनेंतर्गत कार्यरत भारतीय एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन संस्‍थाव्‍दारे औरंगाबाद जिल्‍ह्यातील पैठण तालुक्‍यातील मौजे दामरोळ, धारेगांव, देवगांव तसेच फुलंब्री तालुक्‍यातील मौजे बिल्‍डा, मुर्शीदाबादवाडी, किनगांव या गावात हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत असुन मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. आर. एस. यादव यांनी सदरील शेतक-यांच्‍या शेतावरील प्रयोगांना भेट देऊन पाहणी केली व समाधान व्‍यक्‍त केले.