Monday, June 6, 2016

वळवाचा पाऊसामुळे हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन करणे गरजेचे

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचे आवाहन
सध्या मराठवाडयामध्ये सर्व जिल्हामध्ये वळवाचा पाऊस होत असुन हुमणी किडीचे सुप्त्‍ा अवस्थेतील भुंगे जमिनीतुन बाहेर पडत आहे. हुमणीच्या प्रौढअंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभुळ, कडुलिंब, बोर ई. झाडावर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतूडुन नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतुन निघाल्यानंतर ते बाभुळ, कडुलिंब, बोर ई. झाडावर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात. व अंडयातून निघालेल्या अळया पिकानां नुकसान पोहचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतुन निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्याअगोदरच झाल्यामुळे अंळी पासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
§  झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावामार्च ते जून महिन्‍यात चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळकडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी  मिलनासाठी जमा होतातझाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावाहा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहेतसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
§  प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतातहे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घरझोपडीविहीरीजवळ किंवा झाडावर लावावेतसापळया जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेतहे सापळे साधारपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
§  किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळकडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावीरात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे करुन जातील.
§  जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळकडुनिंबइत्यादी झाडावर किटकनाशकाची फवारणी करावी.

वरिल प्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे सामूहीकरित्या व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पी. आर. झंवरप्रा. बी. व्ही. भेदे यांनी केले आहे.