Wednesday, June 22, 2016

दुष्‍काळग्रस्‍त शेतक-यांच्‍या मदतीसाठी वनामकृवि कर्मचा-यांच्‍या वतीने वीस लाख रूपयाचा निधी माननीय मुख्‍यमंत्री यांना सुपूर्त

मराठवाडयातील भीषण दुष्‍काळाच्‍या व पाणीटंचाईच्‍या पार्श्‍वभुमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी संघ आपले कर्तव्‍य समजुन दुष्‍काळग्रस्‍त शेतक-यांच्‍य मदतीच्‍या उद्देशाने खारीचा वाटा म्‍हणुन सर्व श्रेणी १ ते श्रेणी ४ पर्यंतच्‍या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन दुष्‍काळ निवारण्‍याच्‍या कामासाठी माननीय मुख्‍यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीस देण्‍याचे ठरवुन त्‍या अनुषंगाने विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी माहे मे २०१६ मधील आपल्‍या वेतनातुन एक दिवसाचे वेतन कपात करून माननीय मुख्‍यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी दुष्‍काळ २०१५ यास एकुण रू २०,३५,८२२ /- रूपये (वीस लाख पस्‍तीस हजार आठशे बावीस केवळ) एवढा निधी जमा करण्‍यात आला. सदरिल निधीचा धनादेश दिनांक २० जुन रोजी मुंबई येथे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वनामकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा. दिलीप मोरे यांच्‍या हस्‍ते सुपूर्त करण्‍यात आला. या प्रसंगी संघाचे उपाध्‍यक्ष श्री. प्रदीप कदम, प्रा. राजाभाऊ बोराडे, प्रा. रमेश देशमुख, श्री. सुभाष जगताप, श्री. रंगराव नवगिरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी माननीय मुख्‍यमंत्री यांचे सोबत विद्यापीठाच्‍या विविध समस्‍येबाबत चर्चा करून माननीय मुख्‍यमंत्रयानी समस्‍या सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले व विद्यापीठातील सर्व कर्मचा-यांचे दुष्‍काळ निधीस योगदानाबद्ल अभिनंदन केले.