वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या विभागात फळबाग लागवड कार्यक्रमाचे
आयोजन दिनांक २७ जुलै रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री. रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. व्ही डी पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. डि.
बी. देवसरकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या
हस्ते विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. कृषी महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या
अभ्यासकीय मार्गदर्शनाच्या दृष्टीकोनातुन उद्यानविद्या विभागातील दहा एकर
प्रक्षेत्रावर आंबा व पेरू फळांच्या विविध जातींची तीन हजार झाडांची लागवड करण्यात
आली असुन एक आदर्श फळबाग विकसित करण्यात येत आहे. सदरिल फळबाग विकसित करण्यासाठी कुलगरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री. रविंद्र देशमुख आदींचे विशेष प्राेेत्साहन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग
प्रमुख डॉ. जी. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्राध्यापक,
कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थ्यींनी परिश्रम घेतले.

