मराठवाडयातील अनेक जिल्हातील शेतक-यांचा
सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
रेशीम संशोधन योजना व आत्मा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12
जानेवारी रोजी शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात
आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू हे
होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर होते. व्यासपीठावर
डॉ. यु.एन. आळसे, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. बी. व्हि
आसेवार, आत्मा प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपळे, केंद्रिय रेशीम मंडळाचे श्री.
ए.जे. कारंडे, डॉ सी बी लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक
पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्यासाठी शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय रेशीम उद्योग
निश्चितच आर्थिक स्थर्य प्राप्त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्यातील रामनगर येथील
बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असुन कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया
जाण्याची भीती नाही. प्रत्येक शेतक-यांनी दिड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून
इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे 6
ते 7 पीके घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ.
दत्तप्रसाद वासकर यांनी मराठवाडा तुती रेशीम उद्योगात तुती लागवड व कोष उत्पादनात राज्यात
आघाडीवर असल्याचे सांगुन विद्यापीठातंर्गत मराठवाडयातील सर्व जिल्हयात कृषि
विज्ञान केंद्रामार्फत रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेणार असल्याचे जाहिर केले.
तांत्रिक सत्रात डॉ. यु.
एम. आळसे यांनी कृषि उद्योजकतेच्या बाबत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत
मराठवाडयातील शेतकरी मागे असून रेशीम उद्योगाच्या संधीचा फायदा घेण्याचे सांगितले.
श्री. ए. जे. कारंडे यांनी रेशीम शेती व कीटक संगोपनातील तांत्रीक मार्गदर्शन केले
तर प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी श्री एम एल चपळे शेतक-यांनी रेशीम गट शेतक-यानी
स्थापन करुन फायदा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ सी बी लटपटे
यांनी केले. कार्यक्रमास लातूर, बीड,
नांदेड,
हिंगोली
व परभणी जिल्हयातून 150 शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे एन चौडेकर, ए. बी
काकडे, बालासाहेब गोंधळकर,
रुपा
राऊत, शेख सलीम आदीसह अनुभव आधारित शिक्षण
कार्यक्रमाच्या विद्यार्थींनी परिश्रम घेतले.