Thursday, May 10, 2018

वनामकृवित राष्‍ट्रीय असंसर्गजन्य रोग निदान शिबीर संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील आरोग्य केंद्र आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (एन.सी.डी.) जिल्हा रुग्णालय, परभणी संयुक्त विद्यमाने दि. १० मे रोजी राष्‍ट्रीय असंसर्गजन्य रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी व्‍यंकटेश्वरलू यांच्या हस्ते झाले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी जी इंगोले, कुलसचिव डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियंता डॉ. कडाळे, विद्यापीठ वैद्यकिय अधिकारी डॉ सुब्बाराव आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी यांचा रक्‍तदाब, मधुमेह आदींची तपासणी करण्‍यात आली. शिबिरास अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.