Tuesday, May 8, 2018

वनामकृविच्‍या विद्यार्थिंनीसाठी अद्ययावत व्‍यायामशाळेची सुविधा


आज महिलांसाठी शिक्षणासह विविध संधीची दालने खुली झाली आहेत, कृषि शिक्षणाकडेही मुलींचा मोठा ओढा दिसुन येत आहे. परंतु शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्‍यींनीनी आपल्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर, उस्‍मानाबाद, बदनापुर व परभणी येथील कृषीच्‍या विद्यार्थीनीच्‍या वसतिगृहामध्‍ये अद्ययावत व्‍यायामशाळेची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. विद्यार्थ्‍यींनीच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने राष्‍ट्रीय महिला आयोगाने प्रत्‍येक शिक्षण संस्‍थामध्‍ये सॅनिटरी पॅड व्‍हेंडिंग मशीन बसविण्‍यासाठी सुचविले होते. त्‍याअनुषगांने विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालये व मुलींच्‍या वसतीगृहातील प्रसाधनगृहात व्‍हेडिंग मशीन बसविण्‍यात आले असुन वापरलेले नॅपकिन नष्‍ट करण्‍यासाठी डिस्‍टॉयर मशीनचीही विद्यापीठ परिसरात सुविधा करण्‍यात आली असल्‍याचे शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनी सांगितले.