Thursday, September 27, 2018

इटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न

वसंतराव मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे इटलापूर येथे बालकांचा विकासांक व शालेय संपादणूक वृध्दिंगत करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत बालविकास शास्त्रज्ञ व मानव विकास विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी बालकांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांची काळजी कशी घ्यावी, बालकांच्या वाढांकाचे महत्त्व व त्याचे मूल्यमापन करण्याची शास्त्रोक्त पध्दती, विद्यार्थ्‍यांमध्ये कल्पनाशक्ती कशी वाढवावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे संवर्धन याबाबत प्रात्याक्षिकासह व्याख्यान दिले. यावेळी उपस्थित बालकांपैकी उत्कृष्ट वाढांक असलेल्या बारा विद्यार्थ्‍यांना व त्यांच्या पालकांना बेस्ट चाईल्ड, बेस्ट पॅरेन्टस् अॅवार्ड प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यशाळेत दिलेल्या माहिती आधारे घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्‍यांना व पालकांना गोल्डन स्टार अॅवार्ड प्रमाणपत्र देण्‍यात आली. दिव्यांग बालके असणा-या पालकांचे  प्रा. विशाला पटनम समुपदेशन केले. प्रत्येक गावक-यांना कुटुंबाच्या कल्याणासाठी सक्षम आई व्हायच मलाव किशोरवयीन मुलीसाठी माझी काळजी मीच घेणारया दोन पुस्तिका विनामुल्य देण्यात आल्या. कार्यशाळेत 130 हूनही अधिक पालक, आजी-आजोबा, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्‍या व विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.