Thursday, November 15, 2018

माननीय पद्मश्री अॅड उज्‍वलजी निकम साधणार कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांशी संवादवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषिच्‍या विद्यार्थ्‍यीशी दिनांक 17 नोव्‍हेबर रोजी दुपारी 3.00 वाजता महाराष्‍ट्र राज्‍याचे विशेष सरकारी अभियोक्‍ता पदमश्री अॅड उज्‍वलजी निकम हे युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्‍यातील आव्‍हाने या विषयावर कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात संवाद साधणार असुन संवाद कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण हे राहणार आहे. तसेच शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजीत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदरिल संवाद कार्यक्रमाचा लाभ विद्यापीठातील विद्यार्थ्‍यीनी घ्‍यावा असे आवाहन आयोजक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.