|
डॉ डि एन गोखले |
|
डॉ डि बी देवसरकर |
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ पी जी इंगोले यांची
अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि)
यापदावर नियुक्ती झाली होती, दिनांक ६ डिसेंबर रोजी ते त्यापदावर रूजु झाले तसेच
परभणी कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि)
या
रिक्तपदाचा पदभारही त्यांचाकडेच होता. या रिक्त झालेल्या शिक्षण संचालक तथा
अधिष्ठाता (कृषि)
पदाचा पदभार डॉ डि एन गोखले यांनी तर विस्तार शिक्षण संचालक म्हणुन डॉ डि बी
देवसरकर यांनी दिनांक ६ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला. सदरिल
पदभार माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्या मान्यतेने कुलसचिव डॉ रणजित पाटील यांच्या
आदेशानुसार त्यांनी स्वीकारला. डॉ
डि एन गोखले हे सध्या परभणी कृषि महाविद्यालयाचे तर डॉ डि बी देवसरकर हे गोळेगांव
कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य आहेत.
डॉ डि एन गोखले यांना विद्यापीठात
विविध पदांचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण क्षेत्रात ३० वर्षाचा
प्रदीर्घ अनुभव असुन ते चार वर्ष कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत
होते तर सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य यापदावर गेली सात वर्षापासुन कार्यरत
आहेत. डॉ गोखले यांनी कृषिविद्या विभागातुन आचार्य ही पदवी प्राप्त केली असुन त्यांची
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये शंभर पेक्षा जास्त संशोधन
लेख प्रसिध्द झाले आहेत. तसेच डॉ
डि बी देवसरकर यांना विद्यापीठात कृषि शिक्षण, संशोधन व
विस्तार शिक्षण या क्षेत्रात विविध पदांचा प्रदीर्घ अनुभव असुन त्यांनी कृषि अनुवंशशास्त्र
व वनस्पतीशास्त्राचे विभाग प्रमुख व विद्यापीठाचे कुलसचिव म्हणुन ही कार्य केले
आहे. गेल्या दोन वर्षापासुन गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणुन
कार्यरत असुन ते कृषि अनुवंशशास्त्र व वनस्पतीशास्त्राचे आचार्य पदवीधारक आहेत. त्यांची
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये १२५ पेक्षा जास्त संशोधन लेख
प्रसिध्द झाले आहेत.