परभणी जिल्हयातील मौजे तरोडा येथे ' किसान
गोष्टी ' कार्यक्रम संपन्न
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विदयापीठ यांचे संयुक्त विदयमाने मौजे तरोडा (ता. परभणी)
येथे गुलाबी बोंडअळी निर्मुलन व फरदड मुक्ती यावर 'किसान
गोष्टी' कार्यक्रम दिनांक 30 डिसेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमास
प्रमुख अतिथी म्हणुन विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर अध्यक्षस्थानी
परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे होते. यावेळी विस्तार कृषि
विदयावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे,
प्रगतशील शेतकरी श्री. एकनाथराव साळवे, श्री. नरेश
शिंदे, श्री. पुरुषोत्त्म शिंदे, श्री.
कुलकर्णी, श्री.विठठलराव जवंजाळ, कृषि
विभागातील अधिकारी श्री.सुरेश म्हस्के, गंगाखेड तालुका कृषि
अधिकारी श्री. भगवान कच्छवे, मंडळ कृषि अधिकारी श्री.संघई, श्री. शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर यांनी कापसाची
प-हाटी कुटटी करुन जमिनीत गाढुन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे शेतक-यांना
आव्हान केले तसेच दिवसेंदिवस जमिनीचा –हास होत असुन शेतीमधील अवशेष जसे उसाची पाचट, कापसाची प-हाटी, तु-हाटया मोठया प्रमाणात जाळल्या
जातात ते न जाळता जमिनीत गाढल्यास सेंद्रिय कर्बात वाढ होऊन कापसावरील गुलाबी बोंडअळीचा
प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे सांगितले तसेच प-हाटी उपटुन न
काढता जागेवरच यंत्राच्या साहयाने कुटटी करुन जमिनीत मिसळण्याचा सल्ला त्यांनी
दिला.
अध्यक्षीय भाषणांत श्री. संतोष आळसे यांनी कपाशी प-हाटी कुटटी
यंत्राचे महत्व सांगुन या यंत्रासाठी शासनाकडुन छोटया शेतक-यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध असल्याचे सांगितले. या यंत्रामधुन प-हाटीची पुर्णपणे
कुटटी होत असल्यामुळे लवकर कुजण्यासाठी मदत होते व दुसरे पीक लगेच घेण्यासाठी मदत
होते असे प्रतिपादन केले.
डॉ. यु. एन. आळसे यांनी कापुस प-हाटी कुटटी यंत्राचे एकात्मिक किड
व्यवस्थापनातील महत्व सांगुन प-हाटी कुटटी केल्यामुळे एकरी साधारत: 4-5 टन
सेंद्रिय खत जमिनीस उपलब्ध होऊन त्याचा फायदा जमिन सुधारण्याच्या दृष्टीने होतो
असे सांगितले.
शेतकरी श्री.संजय शेळके यांच्या शेतावर यंत्राव्दारे कापसाच्या
प-हाटीची कुटटी कर-याचे प्रात्यक्षिक दाखवुन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रभाकर
बनसावडे, यांनी
केले. सूत्रसंचालन आत्माचे श्री. इक्कर यांनी केले तर आभार श्री. रेंगे, यांनी मानले. यावेळी श्री. माने, श्री. कुरूगळ, श्री. गायकवाड,,सौ. घोडके आदीसह तरोडा परिसरातील
शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी येथील रोटोकिंग
कंपनी व लक्ष्मी ट्रेडींग कंपनी यांनी
सहकार्य केले.