कृषि संशोधनास चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेवदारे कृषीक्षेत्रातील ई-रिसोर्सची ऑनलाईन यंत्रणा (Consortium of e-Resources in Agriculture) म्हणजेच सेरा
प्रकल्प राबविण्यात येतो. यात उत्कृष्ट दर्जाची सहा हजार
पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ई-नियतकालिके कृषि संशोधकांसाठी उपलब्ध
असुन या सुविधेचा योग्यरित्या उपयोग वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये
आपल्या संशोधनासाठी केला. याबाबत पश्चिम विभागातुन प्रकल्पांतर्गत विद्यापीठास सन
२०१९ चा बेस्ट युजर प्रोफाईल रजिस्ट्रेशन पुरस्कार देण्यात आला. सदरील
प्रकल्पाबाबत जागृती करण्यासाठी जे-गेट यांच्या मार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला
जातो. सदरिल पुरस्कार
दिनांक २८ डिसेंबर रोजी पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात आयोजित
प्रशिक्षण कार्यक्रमात प्रकल्प संचालक डॉ एस के सिंग,
संचालक डॉ आर जी सोमंकुवर, डॉ त्रिपाटी, श्री संजय ग्रोवर यांच्या हस्ते विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम व
मोहन झोरे यांनी स्वीकारला.