वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
परभणी
यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 23 डिसेंबर रोजी हळद उत्पादन व प्रक्रिया
या विषयावर शेतकरी - शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी.
बी. देवसरकर हे होते तर परभणीचे जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी श्री. एस. बी. आळसे, किटकशास्त्र
विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. बंटेवाड, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु.
एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले की, पिक उत्पादन
वाढविण्यासाठी जमिनीच्या पोताप्रमाणे पिकांचे नियोजन करावे तसेच पिकांच्या कालावधीनुसार
जमिनीची निवड करावी. शेती करतांतना आपल्याला आलेल्या अनुभवाचा वापर करावा, शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. शेतक-यांच्या आलेल्या समस्येवर प्रामुख्याने
विदयापीठ संशोधन करत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्री एस.बी.आळसे यांनी हळद हे परभणी जिल्हयात महत्वाचे
नगदी पिक असल्यामुळे, हळद पिकांचे शास्त्रीय पध्दतीने लागवड
व्हावी, यासाठीच शेतकरी शास्त्रज्ञ संवाद आयोजित केलेचे नमूद केले.
तांत्रिक मार्गदर्शनात तोंडापुर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विषेषज्ञ श्री. टी. जी. ओळंबे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. एस. डी. बंटेवाड यांनी रब्बी पिकावरील किड व्यवस्थापनावर तर डॉ. मिनाक्षी पाटील
यांनी हळद पिकावरील रोग व्यवस्थापन व प्रा.डी.डी
पटाईत यांनी
हळदीवरील किड व्यवस्थापनावर मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार श्री योगेश पवार
यानी मानले. कार्यक्रमास परभणी जिल्हयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी श्री. एस. बी. आळसे, डॉ. यु. एन. आळसे आणि श्री. के. आर.
सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. इक्क, श्री. अंभुरे, श्री. सोळुंखे, श्री. पवार, श्री. माने, श्री. कदम, श्री. जोशी तसेच आत्मा परभणी आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीच्या अधिकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.