स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापुस संशोधन योजना यांच्या वतीने दिनाकं १७ ऑक्टोबर रोजी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन यावर एक दिवसीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल वेबीनान मध्ये किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन धोरण प्रसार प्रकल्पाच्या (आयआरएम) लाभार्थी शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला. या प्रकल्पातंर्गत कापूस संशोधन योजनाच्या वतीने जिल्हयातील ५ गावातील एकुण ५० शेतकयांच्या शेतावर कापूस किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. या वेबिनारचे पाथरी तालुक्यातील बाभुळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी
दिल्ली येथील कृषि मंत्रालयाच्या कृषि सहयोग आणि शेतकरी कल्याण
विभागाच्या सहसचिव (पिके) श्रीमती. शुभा ठाकुर
या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहयोगी महासंचालक (आसीएआर) डॉ. आर. के. सिंह हे
होते. कार्याक्रमातंर्गत तालुक्यातील बाभुळगाव
येथील शेतकयांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवुन मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी प्रकल्पाची ओळख व प्रकल्पामुळे शेतकयांना
झालेला फायदा व भविष्यातील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात बाभुळगाव
येथील रमेश गिरी, दिपक नाईकवाडे, वेकंट रणेर, दादाराव रणेर, बाबासाहेब रणेर, भागवत
रणेर, हिराजी शेख या लाभार्थी शेतकयांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. विद्यापीठातर्फे
प्रकल्पाचे समन्वयक व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. डी.डी.पटाईत, वरीष्ठ संशोधन सहकारी
कु. प्रियंका वाघमारे, प्रकल्प सहाय्यक, श्री. इरफान बेग व श्री. नारायण ढगे हे सहभागी
होते. कार्यक्रमाकरीता विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.पी.वासकर, कापूस संशोधन योजनेचे
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. जाधव व केंद्रीय
कापूस संशोधन केंद्र, नागपुर येथील प्रकल्प प्रमुख डॉ. विश्लेश नगराळे यांचे मार्गदर्शन
लाभले.