Saturday, October 23, 2021

वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी

दीक्षांत समारंभात तीन वर्षातील १०,९९७ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्‍यक्ष तथा कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे, अशी माहिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिनांक २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष असुन आज पर्यंत कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन ४७३४५ पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेत, हे उच्‍च शिक्षित कुशल मनुष्‍यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाण निर्मिती केली असुन तुर, सोयाबीन पिकांचे अनेक चांगले वाण शेतकरी बांधवात मोठया प्रमाणात प्रचलित झाले आहे. राज्‍यातील एकुण तुर लागवड क्षेत्रापैकी पन्‍नास टक्के क्षेत्रावर विद्यापीठाचे बीडीएन ७११ हा वाण घेतला जातो. गेल्‍या वर्षी साडे आठ हजार क्विंटल बियाणे निर्मिती विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आली असुन यावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष आहे. गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात केवळ मुख्‍यालयी विद्यापीठ निर्मित दर्जेदार बियाणे विक्री न करता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना विकेंद्रीत विक्री व्‍यवस्‍था करून बियाणे उपलब्‍ध करण्‍यात आले. कोरोना विषाणु रोगाच्‍या परिस्थितीतही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य कोठेही न थांबता, ऑनलाईन पध्‍दतीने चालुच होते, या काळात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम राबविण्‍यात आली, असे माहिती त्‍यांनी दिली.

सदरिल दीक्षांत समारंभ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे स्‍वागतपर भाषण करणार असुन दीक्षांत समारंभात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण १०,९९७ स्‍नातकांना विविध पदवीने माननीय प्रतिकुलपती व्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. विविध विद्याशाखेतील ९९२२ स्‍नातकांना पदवी, ९७८ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ९७ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे, परंतु कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर केवळ पारितोषिके पात्र स्‍नातक व आचार्य पदवी स्‍नातक यांनाच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात येणार असुन इतर स्‍नातकांना ऑनलाईन पध्‍दतीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. समारंभात विविध अभ्‍यासक्रमातील विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात येणार आहे. तसेच कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल विद्यापीठातील प्राध्‍यापक / संशोधक यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात येणार आहे. दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्‍या युटुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार आहे.

पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले. पत्रकार परिषदेस शहरातील प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होतेसदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले. 

अक्र

अभ्‍यासक्रम

एकुण पात्र स्‍नातक

 

आचार्य पदवीचे स्‍नातक (पीएच.डी पदवी)

 

पीएच.डी (कृषि)

७२

पीएच.डी (गृहविज्ञान)

०३

पीएच.डी (अन्‍नतंत्र)

१०

पीएच.डी (कृषि अभियांत्रिकी)

१२

 

एकुण आचार्य पदवी स्‍नातक

९७

 

 

 

 

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

एम. एस्सी. (कृषि)

७१९

एम. एस्सी. (गृहविज्ञान)

१८

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

९७

एम. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

२३

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

४१

एम.बी..(कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

८०

 

एकुण पदव्‍युत्‍तर पदवी स्‍नातक

९७८

 

 

 

 

पदवी अभ्‍यासक्रम

 

बी. एस्‍सी. (कृषि)

६३३३

बी. एस्‍सी. (उद्यानविद्या)

८९

बी. एस्‍सी. (गृहविज्ञान)

७४

बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी)

५२६

बी.टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

१८३३

बी. एस्‍सी. (कृषि जैवतंत्रज्ञान)

९१७

बी.बी.. (कृषि)

१५०

 

एकुण पदवी अभ्‍यासक्रमातील स्‍नातक

९९२२

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर, पदवी स्‍नातक

१०९९७