वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषी अनुसंधान पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत आधुनिक स्वयंचलित हॉयड्रोपॉनीक आणि पॉलीहाऊस या विषयावर दोन आठवडीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 04 ते 16 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले असुन दिनांक 4 ऑक्टोबर रोजी या प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त (उद्यानविद्या) डॉ. नवीन पटले हे उपस्थित होते तर नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ, गोपाळ शिंदे व उप-अन्वेषक डॉ. आर. पी. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. नवीन पटले म्हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होत आहे. भारत सरकार विविध योजनांच्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञानात स्वंयपुर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. पॉलीहाऊस व हॉयड्रोपॉनीक सारख्या तंत्रज्ञानाची जोड शेतक-यांच्या सर्वांगीन विकासासाठी व नवीन व्यवसाय निर्मीतीसाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ, गोपाळ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविकात श्री.रहीम खॉन यांनी प्रशिक्षण आयोजनाच्या मागील संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजी. खेमचंद कापगते यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शिवराज शिंदे, इंजी. तझीम पठाण, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, इंजी. शिवानंद शिवपुजे,इंजी. गोपाळ रनेर, इंजी. अपुर्वा देशमुख, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, रेखा ढगे व मारोती रणेर, गंगाधर जाधव व जगदीश माने आदींनी परीश्रम घेतल. प्रशिक्षणास पन्नास पेक्षा जास्त विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व पदव्युत्तर विद्यार्थ्यी यांनी सहभाग नोंदविला.