राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या (NAHEP) माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV), परभणीच्या ७८ संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १ ते ३ महिने संशोधन प्रशिक्षण व संशोधन प्रात्यक्षिका करिता विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक प्रा. गोपाळ शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून भेट घेतल्या नंतर संशोधन प्रबंध लिहून रशिया व बेलारूस देशातील शासकीय आंतरराष्ट्रीय परिषदेत एकूण १५ शोधनिबंधाचे सादरीकरण केले व त्यातुन ८ उत्कृष्ठ शोधनिबंध नेचर व स्प्रिंजरद्वारा संयुक्तरित्या प्रकाशीत केले आहेत. या शोधनिबंधाच्या लेखनामध्ये विद्यापीठाच्या २५ संशोधकांचा सहभाग असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या शोधनिबंधाचे त्याचे कॉपीराईट हक्क या संशोधकाना प्राप्त झाले आहेत.
आयोजक संस्थामध्ये बेलारूस राष्ट्रीय अकादमी ऑफ
सायन्सेसच्या कृषि मशीनीकरणावरील शास्त्रीय आणि प्रायोगिक केंद्र (RUE SPC, बेलारूस) आणि सेंट पीटर्सबर्ग फेडरल
रिसर्च सेंटर ऑफ रशियन अकादमी ऑफ सायन्सेस (SPC RAS, रशिया) या दोन्ही संस्थानी महत्वाची भूमिका
निभावली.
या परिषदेत प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक प्रा.
गोपाळ शिंदे यांनी "डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी संशोधनातील नेमकेपणा" या
विषयावर प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटन पर भाषण व सादरीकरण दिले. राष्ट्रीय कृषी
उच्च शिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी
संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देत, भारतीय संशोधकांनी जागतिक स्तरावर प्रथमच २५ टक्के इतकी
आंतरराष्ट्रीय शासकीय साखळीत उत्कृष्ठ भूमिका निभावली आहे, ज्यामुळे परभणीतील वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ही उच्च कामगिरी ठरली आहे.
या साठी बेलारूसचे प्रा. डॉ. मिखाइल टाटूर, रशियाचे प्रा. डॉ. आंद्रेई, प्रा. डॉ. पावेल नवित्स्की, आणि प्रा. डॉ. फ्रान्सिस्को रोविरा-मास
यांनी या प्रकल्पात पुढाकार घेवून त्यांनी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाना सहकार्य
केले याबद्दल विद्यापीठ त्यांचे विशेष आभार करत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) उपमहानिर्देशक (शिक्षण)
आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे
(NAHEP) राष्ट्रीय संचालक माननीय डॉ. आर. सी.
अग्रवाल, उप-संचालक माननीय डॉ. अनुराधा अग्रवाल, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक प्रा. गोपाळ
शिंदे यांनी विद्यापीठाच्या सर्व संशोधकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शोधप्रबंध लेखकामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू
माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या सह शिक्षण संचालक डॉ. यू. एम. खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. व्ही. असेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल
इब्राहिम, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक गोपाळ शिंदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी.
क्षीरसागर, शास्त्रज्ञ बी. एस. अगरकर, पी. यू. घाटगे, दिगंबर पेरके, धीरज पाथरकर, श्रद्धा व्ही. मुळे, डी. डी. टेकले, सुनिता पवार, पी. एच. गोरखेड़े, बुद्धभूषण डी. वानखेडे, आर. एस. साल्वे, सुशांत आर. भालेराव,ओंकार काकडे, डी. व्ही. समिंद्रे, स्नेहा भिसे, अपेक्षा ठोम्बरे, संग्राम वंधेकर, अबोली भातलावांडे, प्रत्यूष राख यांचा समवेश आहे.
या विशेष कामगिरीमुळे विद्यापीठातील संशोधनास
चालना मिळाली असून शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भविष्यात माननीय कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ
संशोधनामध्ये उच्च पातळी मिळवेल असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.