वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी आणि हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स (HarvestPlus
Solutions – HPS), वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) यांच्यात कृषि,
पोषण व अन्नसुरक्षा क्षेत्रातील जागतिक सहकार्य अधिक बळकट
करण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
हा करार नवी दिल्ली येथील द पार्क, कनॉट प्लेस येथे दि. १६ डिसेंबर २०२५
रोजी आयोजित राष्ट्रीय पोषण व जैवपोषण विस्तार कार्यशाळेच्या
निमित्ताने करण्यात आला.
या सामंजस्य करारावर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि आणि
हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंदर ग्रोव्हर यांनी
स्वाक्षऱ्या केल्या.
या धोरणात्मक
भागीदारीअंतर्गत हार्व्हेस्टप्लस, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधनासाठी सल्लागार
गट (CGIAR) तसेच सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील भागीदारांकडून
विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व उपाययोजनांचे विस्तार (स्केलिंग) व
व्यावसायिकीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या सहकार्याच्या माध्यमातून
शेतकऱ्यांचे व दुर्बल घटकांचे उपजीविका स्तर उंचावणे तसेच जागतिक अन्न व पोषण
सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाय विकसित करणे हे प्रमुख
उद्दिष्ट आहे.
या करारामुळे कृषि व
पोषण क्षेत्रात शाश्वत,
दीर्घकालीन व अर्थपूर्ण परिणाम साधण्यास मदत होणार असून, देशासह जागतिक स्तरावर विशेषतः दुर्बल व वंचित समुदायांसाठी लाभदायी ठरणार
आहे.
हार्व्हेस्टप्लस सोल्यूशन्स
ही वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे आधारित उद्देशप्रधान, जागतिक
स्तरावरील नेटवर्क स्वरूपाची संस्था आहे. हार्व्हेस्टप्लस, CGIAR तसेच सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील भागीदारांकडून विकसित होणाऱ्या क्रांतिकारी
नवकल्पनांचे प्रसारण, विस्तार व व्यापारीकरण वेगाने घडवून आणणे
हा हार्व्हेस्टप्लसचा मुख्य उद्देश आहे. उपजीविका, जागतिक अन्न
व पोषण सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जात, विशेषतः अतिसंवेदनशील
लोकसमूहांच्या कल्याणासाठी जागतिक स्तरावर अर्थपूर्ण व शाश्वत परिणाम साधण्याचा हार्व्हेस्टप्लस
प्रयत्न करते. भारतामध्ये हार्व्हेस्टप्लसने मुलांसाठी तीन दशलक्ष जेवणांचे वितरण करण्यास
मदत केली असून ४,५०,००० पोषण साक्षरता प्रशिक्षणांचे
आयोजन केले आहे.
MoU
Signed between VNMKV, Parbhani and HarvestPlus Solutions
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, has
signed a Memorandum of Understanding (MoU) with HarvestPlus Solutions (HPS),
Washington D.C., marking a significant step towards strengthening global
collaboration in the areas of agriculture, nutrition, and food
security. The MoU was signed by Dr. Indra Mani, Vice-Chancellor, VNMKV,
Parbhani, and Mr. Ravinder Grover, Chief Operating Officer, HarvestPlus
Solutions, on the occasion of the National Nutrition & Biofortification
Scaling Workshop held at New Delhi on 16th December 2025.
This strategic partnership will focus on scaling and
commercialization of innovative solutions emerging from HarvestPlus, CGIAR, and
public–private sector partners, with a strong emphasis on improving livelihoods
and addressing global food and nutrition security challenges. The collaboration
aims to create a sustainable and meaningful impact, particularly for vulnerable
communities across the globe.

