नागपुर येथे अॅग्रोव्हिजन २०१४ कृषि प्रदर्शनाचे
आयोजन दि ४ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असुन यात देशातील भारतीय कृषि
संशोधन परिषदेचे विविध संशोधन संस्था, कृषि विद्यापीठे, महाराष्ट्र शासन तसेच
विविध कृषि संबंधी कंपन्याचे २०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे. या कृषि
प्रदर्शनीचे उदघाटन मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,
अध्यक्षस्थानी केंद्रीय भुतल परिवहन व ग्रामीण विकास मंत्री मा श्री नितीन
गडकरी, प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे अर्थमंत्री मा. श्री सुधीर मुनगुंटीवार, कृषि
शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष मा डॉ सी डी मायी आदी मान्यवर उपस्थित
होते. या प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या दालनाचा समावेश
कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्या
मार्गदर्शनानुसार करण्यात आला असुन या दालनास शेतक-यांचा मोठया प्रतिसाद लाभत
आहे. या दालनास दि ४ डिसेंबर रोजी केंद्रीयमंत्री मा श्री नितिन गडकरी यांनी भेट
देऊन विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे एमएयुएस-१६२ वाणासह विविध
तंत्रज्ञानाची माहिती घेतली, यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ आनंद
गोरे व वैजनाथ सातपुते यांनी माहिती दिली.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Friday, December 5, 2014
Thursday, December 4, 2014
शेतकरी बांधवाना कृषि विद्यापीठाचे आवाहन
मराठवाडयातील आठही जिल्हयात खरीप हंगामात अपु-या पावसामुळे
खरीपातील पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही, तसेच रब्बी हंगामातील पेरणीच्या
क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. अपेक्षीत उत्पादन न आल्यामुळे बरेचसे शेतकरी
खचुन जाऊन आत्महत्येकडे वळत आहेत. अशा अडचणीच्या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी
खचुन न जाता सध्या उभी असलेली रब्बी पिके व चारा पिकांचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने
करावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्राव्दारे
विकसीत केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्ध असुन त्याचा गरजेनुसार वापर करावा,
पशुधनाची निगा व देखभाल करावी तसेच शेतकरी बांधवांनी अशावेळी कोणत्याही प्रकारे
वेगळा विचार न करता विद्यापीठाशी तांत्रिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती
केंद्राच्या दूरध्वनी ०२४५२-२२२९००० या क्रमांकावर संपर्क करावा, महाराष्ट्र
शासन व कृषि विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू
मा डॉ बी व्यंकटेश्वरलु व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले
आहे.
Wednesday, December 3, 2014
Tuesday, December 2, 2014
एडस रोगाचे समुळ उच्चाटनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा .....शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण
कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त चित्र प्रदर्शनीचे आयोजन
********************************************
जागतिक एड्स दिनानिमित्त कृषि अभियांत्रिकी
महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्यात
आले तर कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र
लोलगे, वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, वैदयकीय अधिकारी डॉ सुब्बाराव यांची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण मार्गदर्शन
करतांना म्हणाले की, जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य “गेटिंग
टू झिरो” म्हणजेच
नवीन
एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही, कलंक व भेदभाव शून्यावर आणणे व
एड्सने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे. शून्य गाठण्याची उद्दिष्टे साध्य
करण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर जबाबदारी घेऊन सातत्याने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातुन एड्स रोगाचे
समुळ उच्चाटनासाठी महाविद्यालयीन जीवनात एड्स विषयी प्रबोधन होणे आवश्यक असुन युवकांनी
या रोगाबाबत माहिती घेऊन समाजात जागृतीसाठी पुढे यावे, असा सल्लाही त्यांनी
दिला. कार्यक्रमात प्राचार्य डॉ उदय खोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ देवेंद्र
लोलगे व वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी आदींनीही एड्स रोगाबाबत मार्गदर्शन
केले. एड्स जनजागृती चित्र प्रदर्शन मार्फत व लोकशाहीर प्रकाश कांबळे यांनी आपल्या
शाहीरीच्या माध्यमातुन एड्स रोगाबाबत प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वयंसेविका नुतन
नाईक तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंसेवक अक्षय
प्रधान, पंकज खंदारे, बालाजी गोडंगे, आर्शद शेख, रूपेश नागनाथवार, निखिलेश परदेशी,
संजय राऊत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रा विवेकानंद भोसले, प्रा हरिश
आवारी, प्रा प्रमोदिनी मोरे, प्रा संजय पवार, प्रा मधुकर मोरे, प्रा संदिप पायळ आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी,
अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
![]() |
| लोकशाहीर प्रकाश कांबळे व त्यांचा चमु शाहीरीच्या माध्यमातुन एड्स रोगाबाबत प्रबोधन करतांना |
Saturday, November 29, 2014
पुणे येथे कृषि उद्योजकता विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
कृषि
पदवीधर उद्योजकांच्या नावाची डिरेक्टरी होणार प्रसारित
राज्यातील
चारही कृषि विद्यापीठे आणि जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांच्या
सयुक्त विद्यमाने पुणे, बिबवेवाडी
येथील लोकशाहीर साठे नाटयगृहात १५ व १६ डिसेंबर २०१४ दरम्यान चारही कृषि
विद्यापीठांच्या कुलगुंरूच्यामार्गदर्शनाखाली
कृषि उद्योजगता, व्यापारातील
जागतिक संधी या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय
परिसंवादामध्ये कृषि व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे कृषि
पदवीधर, कृषि संशोधक, कृषि शास्त्रज्ञ
व विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. शेती व्यवसाय व कृषि उद्योगांच्या
अनुषंगाने झालेल्या कामाचा मागोवा व कृषि उद्योग व्यवसायांना नवी दिशा देण्याच्या
उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात कृषि व्यवसाय व्यवस्थापन, कृषि
निविष्ठा उद्योग, कृषि पणन, मुल्यवर्धन
तंत्रज्ञान व कृषि उद्योजगता इत्यादी विषयांवर चर्चासत्रात भर देण्यात येणार
आहे. कृषि क्षेत्राला कृषि व्यवसायाचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी, कृषि व्यवसायांमध्ये
कृषि पदवीधरांना असलेल्या संधी व वाव, कृषि व्यवसायांमध्ये
कृषि पदवीधरांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना यावर अधिक भर या परिसंवादात दिला
जाणार आहे. या राष्ट्रीय परिसंवादाचे औचित्य साधुन कृषि पदवीधर व्यावसायिकांची
डिरेक्टरी / सुची प्रकाशीत करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या कृषि पदवीधरांनी
स्वत:चा कृषि व्यवसाय सुरू केलेला असेल त्यांचे नाव, पत्ता, कृषि व्यवसायाचे
स्वरूप, संपर्क
क्रमांक, ईमेल, वेबसाईट
इत्यादी माहितीचा या डिरेक्टरी / सुचीमध्ये समावेश केला जाणार आहे. यामुळे कृषि
व्यवसायात असलेल्या राज्यातील कृषि पदवीधरांची संपुर्ण माहितीची यादी एकाच
ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
राज्यातील
सर्व कृषि पदवीधरांना आवाहन करण्यात येते की, ज्या
कृषि पदवीधरानी स्वत:चा कृषि व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांनी
या डिरेक्टरीमध्ये आपल्या नावाची नोंद करावी. या डिरेक्टरीमध्ये आपल्या
नावाचा व व्यवसायाच्या माहितीचा समावेश करण्यासाठी www.sauagribusiness.com या
संकेतस्थळावर जावुन आपली माहिती भरावी तसेच आपल्या कृषि महाविद्यालयाशी किंवा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत येणा-या कृषि पदवीधरांनी जनसंपर्क अधिकारी
डॉ प्रविण कापसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि अधिष्ठाता डॉ भीमराव उल्मेक व वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले आहे.

Monday, November 24, 2014
Monday, November 17, 2014
मराठवाडयातील हवामान व पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक
परभणी : मागील काही दिवसांपासुन राज्यात तसेच मराठवाडयातील काही भागात बेमोसमी पाऊस पडला आहे. ज्या भागात जमिनीतील ओलाव्यात वाढ झाली, त्याभागात रब्बी हंगामातील गहु, करडई व हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. करडई हे पीक कमी पाण्यावर तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेऊन सद्यस्थितीत पडणा-या अवकाळी पावसाचा करडई पीकाला फायदा होऊ शकतो. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रसारित केलेल्या करडईच्या परभणी-१२ (परभणी कुसुम) व परभणी-४० या वाणांचा उशिरा पेरणीसाठी वापर करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडे परभणी-१२ या करडईच्या सुधारित वाणाचे बियाणे उपलब्ध असुन शेतकरी बांधवांनी सदरिल वाणाची पेरणी करावी व पडलेल्या पावसाचा फायदा घ्यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले आहे. परभणी-१२ या करडईच्या वाणाची सत्यतादर्शक बियाणाच्या पाच किलो वजनाच्या पिशवीची किंमत ३७५ रूपये आहे. तसेच हरभरा पीकाचे आकाश व विजय या वाणाचे व गहु पिकात लोकवन वाणाचे बियाणे विद्यापीठाकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. बियाणे खरेदीसाठी बीजोत्पादन अधिकारी डॉ एस बी घुगे (९४२१४६०१४३) यांच्याशी संपर्क करावा.
Subscribe to:
Posts (Atom)