Tuesday, December 11, 2012

कै. डॉ. रावसाहेब चोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीतील माजी विस्तार संचालक डॉ रावसाहेब चोले यांचे दिनांक १०/१२/२०१२ रोजी दु:खद निधन झाले. 

आज त्यांना विद्यापीठाच्यावतीने श्रद्धांजली वाहाण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ किशनराव गोरे आपल्या शोकसंदेश म्हणाले की कै रावसाहेब चोले यांचा मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा होता. त्यांनी जवळपास ३६ वर्षे विविध पदावर कार्य करून विद्यापीठाच्या जडण-घडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. तसेच साहित्य व सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे विद्यापीठातील सर्व अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिना अतिव दु:ख झाले आहे. 


याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ एन डी पवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ पी एस कदम, गोळेगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ आर आर कोटीखाने, विभाग प्रमुख डॉ एम बी ठोंबरे, डॉ तुकाराम तांबे,  डॉ विलास पाटील, उपकुलसचिव श्री रविंद्र जुक्टे  तसेच विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग व विदयार्धी मोठ्या संख्येने उपस्थित होते.