Saturday, December 29, 2012

महिला शेतकरी मेळावाचे आयोजन


      मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय व गृह विज्ञान महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन कृषी महाविद्यालय, परभणीच्या सभागृहात करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मा. श्रीमती रजनीताई सातव यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे राहणार आहेत. जालनाच्या महिला उद्योजिका सौ. संजीवनी जाधव, लातूरचे  कृषी सहसंचालक श्री के. एन. देशमुख व औरंगाबादचे  कृषी सहसंचालक श्री शु. रा. सरदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
       कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ महिलांना कृषी तंत्रज्ञानबाबत   मार्गदर्शन करणार आहेत तसेच महिला शेतकरी व उद्योजकासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास शेतकरी महिलांनी मोठया संख्याने उपस्थिती राहावे असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा विशाला पट्टणम  आणि  मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ राजेश्वर कोटीखाने यांनी केले आहे.