Tuesday, May 14, 2013

म.कृ.वि. परभणी येथे महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरण कार्यशाळा कार्यक्रमम. फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती कार्यक्रर्मानिमित्‍य गृहविज्ञान महाविद्यालय, म.कृ.वि, परभणी व कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने "महिलांचे आरोग्‍य व सक्षमीकरणासाठी कार्यशाळा आणि हिमोग्‍लोबीन तपासणी" कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. काय्रक्रमासाठी परभणी शहरातील नामवंत नेत्र तज्ञ. डॉ. अर्चना गोरे उपस्थित होत्‍यो. कार्यक्रमात 150 महिला व विद्यार्थीनिंनी सहभाग नोंदवला. गृहविज्ञान महाविद्यालयातील तज्ञामार्फत गृह‍व्‍यवस्‍थापन व आरोग्‍य बाबत कार्यशाळा घेण्‍यात आली. महिलांमध्‍ये हिमोग्‍लागबीनचे महत्‍व व त्‍याचा आरोग्‍याशी संबध यावर सविस्‍तर मार्गदर्शन करण्‍यात आले. ज्‍यांचे हिमोग्‍लोबीन आवश्‍यक प्रमाणात आहे अशा महिलांना "उत्‍कृष्‍ठ आरोग्‍य पुरस्‍काराने" सन्‍मानित करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या, डॉ. विशाला पटनम होत्‍या. कार्यक्रमासाठी डॉ. विजया नलावडे, डॉ. जया बंगाळे, डॉ. माधूरी कुलकर्णी व डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे यांनी केलें तर सुत्र संचलन प्रा. निता गायकवाड, यांनी केलें. प्रा. अनिस कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी प्रा. मिलींद सोनकांबळे, डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ. भगवान आसेवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.