Wednesday, May 15, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त भव्‍य खरीप शेतकरी मेळावा


मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्‍या 41 व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालयामार्फत भव्‍य खरीप शेतकरी मेळावाचे आयोजन दिनांक 18 मे, 2013 शनीवार रोजी सकाळी 11.00 वाजता वैद्यनाथ वसतीगृह मैदान, प्रशासकीय इमारीतजवळ करण्‍यात आला आहे. सदरील मेळाव्‍याचे उद्द्याटन महाराष्‍ट्र राज्‍याचे महसुल, पुनवर्सन व मदतकार्य, सहकार पणन व वस्‍त्रउद्योग राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशदादा सोंळके यांच्‍या शुभहस्‍ते होणार आहे. या कार्यक्रमास सांस्‍कृतिक कार्य, सामान्‍य प्रशासन, शालेय शिक्षण, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास, राजशिष्‍टाचार व अल्‍पसंख्‍यांक विकास राज्‍यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान आणि वैद्यकीय शिक्षण, उच्‍च व तंत्रशिक्षण, विशेष सहाय व अपारंपारीक उर्जा राज्‍यमंत्री मा. ना. श्री. डी. पी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मेळाव्‍यात चर्चासत्र, प्रदर्शन, प्रात्‍यक्षीके, विद्यापीठाची बियाणे विक्री इत्‍यादी उपक्रमांचा समावेश राहणार आहे6. यावर्षी6 मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात राष्ट्रिय पातळीवरील तज्ञ भोपाळ (मध्‍यप्रदेश) येथील केंद्रिय कृषि अभियांत्रीकी संस्‍थ्‍ेा अंतर्गत असलेल्‍या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी आणि इरगोनॉमीक्‍स अॅन्‍ड सेफटी इन अॅग्रीकलचर प्रकल्‍पाचे प्रकल्‍प समन्‍वयक डॉ. एल. पी. गिते तसेच पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संशोधन संचालक डॉ. एम. जी. लांडे हे विशेष अथिती म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी या शेतकरी मेळाव्‍यात भव्‍य असे कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले असुन यामध्‍ये देशातील अग्रगण्‍य अशा भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या अंतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे तसेच खाजगी संस्‍थेचे शेतक-यांना उपयुक्‍त असलेले दालने हे आकर्षणाचा भाग म्‍हणुन राहणार आहे.
      या प्रसंगी विद्यापीठाचे विविध पिकांचे बियाणे विक्रिचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. या मेळाव्‍याचा लाभ मराठवाडयातील व राज्‍यातील जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी व कृषि उद्योजकांनी घ्‍यावा असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्‍यात आले आहे.