Tuesday, May 14, 2013

म.कृ.वि., परभणीत रक्‍तदान शिबीर      महात्‍मा फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संयुक्‍त जयंती कार्यक्रर्मानिमित्‍य काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघ, म.कृ.वि. यांच्‍या वतीने दि.13/04/2013 रोजी आरोग्‍य केंद्रात रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या शिबीराचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमास संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता डॉ. व्‍ही. एस. शिंदे, संचालक संशोधन डॉ. जी. बी. खंडागळे, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, डॉ. विशाला पटनम, कास्‍ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्‍यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुब्‍बाराव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शहरातील नामवंत डॉक्‍टर हेमंत गुलवाडी व डॉ. कनकदंडे यांनी रक्‍तदानाचे महत्‍व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. संदिप पायाळ व प्रास्‍तावीक प्रा. अनिस कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी महासंघाचे पदाधिकारी डॉ. आसेवार, डॉ. खंदारे, प्रा. सोनकांबळे श्री. घागरमाळे इत्‍यादिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महासंघाचे सर्व पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.