विद्यापीठाच्या सर्व कर्मचा-यांनी निष्ठेने कार्य करून विद्यापीठाचे नाव मोठे करण्यात हातभार लावावा, स्वत:च्या कार्यातुन स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे मा. कुलगूरू डॉ किशनराव गोरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कर्मचारी संघाच्या वतीने गुरूपौर्णिमानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, शेतक-यांसमोर शेतीच्या अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्याचा प्रत्येक कर्मचा-यांनी प्रयत्न करावा, शेतकरी केंद्रबिंदु मानुन कार्य करावे.
यानिमित्य मा. कुलगूरू यांचा सपत्नीक सत्कार
करण्यात आला. मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष प्रा.
दिलीप मोरे यांनी तर मा. सौ. कलावंतीताई किशनराव गोरे यांचा सत्कार डॉ. विजया
नलावडे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप मोरे
यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. जे. एल. कातकडे
यांनी केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपले मनोगत व्यक्त
केले. याप्रसंगी वनामकृवि
डॉ. विलास पाटील, डॉ. पी. एन. सत्वधर, डॉ.
वाघमारे, उपाध्यक्ष श्री प्रदिप कदम, बालासाहेब घोलप, श्री दिवाकर काकडे, डॉ. परमेश्वर केदार, सरचिटणीस
श्री ज्ञानोबा पवार, श्री पी बी शिंदे, सह सरचिटणीस श्री एकनाथ कदम, डॉ. महेश
देशमुख, श्री. श्रीराम घागरमाळे, श्री. ओम ठाकुर, श्री. कोकणे, डॉ धीरज कदम, प्रा.
सचिन मोरे आदी उपस्थीत होते.