Saturday, July 20, 2013

परभणी जिल्‍हा कृषि हवामान सल्‍ला


मागील आठवडयाची हवामानस्थिती
दिनांक १९ ते २३ जुलै २०१३ करिता हवामान अंदाज
परभणी जिल्‍हयात मागील आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ होते. दिवसाचे कमाल तापमान २३.० ते ३१.५ अंश सेल्सिअस च्‍या दरम्‍यान होते. जे या काळातील सरासरीपेक्षा १.० ते ८.६ अंश सेल्सिअस ने कमी होता. तर किमान तापमान २१.५ ते २३.५ अंश सेल्सिअस च्‍या दरम्‍यान होते. जे या काळातील सरासरीपेक्षा १.० अंश सेल्सिअस ने कमी ते ०.८ अंश सेल्सिअस ने अधिक होते. वा-याचा वेग ताशी ४.८ ते ८.५ कि.मी. होता. हा वेग या काळातील सरासरी पेक्षा २.४ ते ५.२ किमी प्रति तास ने कमी होता. एक जुन ते आजपर्यंत ५१३.८ मीमी पाउस झाला आहे. तर १ जानेवारी पासून आजपर्यंत ५५७.३ मी.मी एकुण पाउस पडला आहे. 
परभणी जिल्‍हयामध्‍ये या आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे. वारा ताशी १५.० ते १७.० कि.मी. वेगाने नैऋत्‍य-पश्चिम दिशेने वाहील. कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० अंश सेल्सिअस राहील. तसेच हवेतील आर्द्रता सकाळी ८१ ते ८५ टक्‍के आणि दुपारी ५५ ते ६५ टक्‍के राहील.

विशेष सुचना : या आठवडयात  आकाश पुर्णतः ढगाळ राहून जोरदार स्‍वरूपाचा पाउस पडण्‍याची शक्‍यता आहे.
कृषि सल्‍ला
पिकांचे नाव व अवस्‍था
कृषि सल्‍ला
सोयाबीन
पावसाचे अतिरिक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच तण नियंत्रणासाठी कोळपणी करावी. तणांचा प्रादूर्भाव अधिक असल्‍यास इमॅझिथॅफर या तंणनाशकाची ०.६ किलो क्रिया शिल घटक प्रति हेक्‍टर या प्रमाणात फवारणी करावी. ज्‍या ठिकाणी पाने खाणा-या आळयांचा प्रादूर्भाव दिसून येत असेल अशा ठिकाणी क्विनॉलफॉस २५ टक्‍के २० मिली किंवा क्‍लोरोपायरीफॉस ७० टक्‍के २० मिली किंवा इमामेक्टिन बेन्‍झोएट ५ एस.जी.३.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यातून वापसा येताच फवारणी करावी. 
बाजरी
बाजरीचे पीक वाढीचे अवस्‍थेत आहे. वापसा येताच कोळपणी करावी.
मुग/उडीद
पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. तण नियंत्रणासाठी वापसा येताच कोळपणी करावी.
तीळ/कारळ
पिकातील पावसाचे अतिरीक्‍त पाणी पीका बाहेर काढून द्यावे. वापसा येताच पिकात विरळणी व कोळपणी करावी.
हळद /आले
वापसा येताच खुरपणी करून तण नियंत्रण करावे.
केळी
केळीची मृगबाग लागवड केली असल्‍यास वापसा आल्‍यानंतर ८२ ग्रॅम युरीया व २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्‍फेट प्रति झाडे द्यावे.
डाळिंब
बागेतील पावसाचे अतिरीक्‍त पाणी बाहेर काढून द्यावे. वापसा येताच तणनियंत्रण करावे.
चिकु
नविन लागवड केलेल्‍या चिकु बागेत आळयात पाणी साचून रहाणार नाही. याची काळजी घ्‍यावी. खुंटावर येणारी फुट काढून टाकावी. कलमाना काढीचा आधार द्यावा. 
आंबा
नविन लागवड केलेल्‍या आंब्‍यामध्‍ये जागेवरमृदुकाष्‍ट कलम करावी. कलमी करणासाठी परभणी हापूस, केशर, सिंध्‍दू या वाणांची कलम कांडयाचा वापर करावा.  
पेरू
नविन लागवड केलेल्‍या बागेतील पावसाचे अतिरीक्‍त पाणी बागे बाहेर काढून द्यावे.
भाजीपाला़
वापसा येताच मीरची वांगे, टोमॅटो या भाजीपाल्‍याचा पुर्नरलागवड करावी. तसेच भेंडी, गवार, चवळी या भाजीपाल्‍याची लागवड करावी.
कृषिअभियांत्रिकी
पावसाळा सुरू झाला आहे. पावसाचे अतिरीक्‍त पाणी वाहून नेण्‍यासाठी शेताच्‍या बाजुला गवताचे चर असतात. गवताच्‍या चरांची त्‍वरित दुरूस्‍ती करून द्यावी. चर फुटला असेल तर त्‍याची डागडूगी करून घ्‍यावी. जास्‍त गवत वाढले असेल तर ते कमी करून घ्‍यावे. गवताचा चरातून पुर्णपणे गवत काढून घेउ नये. अन्‍यथा गवताच्‍या चराचीच धूप होउन जाईल. पावसाचे अतिरिक्‍त पाणी गवताच्‍या चरातून सहजपणे वाहून गेल्‍यामुळे शेतातील मातीची धूप आपण रोखू शकतो.
सदर कृषि सल्‍ला पत्रिका मराठवाडा ृषि विद्यापीठ, परभणी येथील एकात्मिक ृषि हवामान सल्‍ला सेवा योजनेतील तज्ञ समितीच्‍या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्‍यात आला.                                        

केंद्र प्रमुख  
कृषि हवामानशास्‍ञ विभागपरभणी ४३१ ४०२
पत्रक क्रमांक २८/२०१३  दिनांक १९/०७/२०१३