Wednesday, November 20, 2013

वानप्रस्‍थाश्रमातील जीवनही नातवडांमुळे सुसहय



जीवनाच्‍या तिस-या टप्‍प्‍यातील म्‍हणजेच वानप्रस्‍थाश्रमातील जीवनही केवळ नातवंडामुळे सुसहय व आनंदी झाले असल्‍याची कबुली जागतिक आजीआजोबा महोत्‍सवात उपस्थित आजीआजोबांनी दिली. नोव्‍हेबर महिन्‍यातील तिस-या रविवारी साज-या होणा-या जागतिक आजीआजोबा महोत्‍सवाचे आयोजन विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील एलपीपी स्‍कुल मार्फत करण्‍यात आले होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षा सहयागी अधिष्‍ठाता तश्रा प्राचार्या प्रा विशाला पटणम होते तर आजी आजोबांचे प्रतिनिधी श्री शिवाजी कच्‍छवे, श्रीमती कुसुमताई औंढेकर, प्रा रमन्‍ना देसेटी यांची विशेष उपस्थिती होती. कुटुंबामध्‍ये नातवंडाच्‍या संगोपनात महत्‍त्‍वाची भुमिका निभावणा-या आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी हा महोत्‍सव सर्व कुटुबियांनी मोठया उत्‍साहाने साजरा करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा विशाला पटणम यांनी भाषणात केले. ज्‍या बालकांना आजी आजोबांचा सहवास लाभतो अशा बालकांचा सर्वागींण विकास‍ही उत्‍तमरित्‍या होतो असे त्‍या म्‍हणल्‍या. या महोत्‍सवानिमित्‍त नातवंडाच्‍या संगोपणात माझा वाटा याविषयावर निबंध स्‍पर्धा आजी आजोबांसाठी घेण्‍यात आली, त्‍या स्‍पर्धातील विजेते श्रीमती लक्ष्‍मीबाई कामाजी डाकोरे, मनिषा दत्‍तात्रय जोशी, श्री शिवाजी कच्‍छवे व कुसुम शंकरराव औढेंकर यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला त्‍यांचे अध्‍यक्षांच्‍या हस्‍ते स्‍मृतीचिन्‍ह व प्रमाणपत्रे देउन सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी विजेत्‍या आजी आजोबांनी आपल्‍या उत्‍कट भावना व्‍यक्‍त केल्‍या. कार्यक्रमाचे संचलन डॉ जया बंगाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ वीणा भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्राध्‍यापक वृंद व कर्मचारी वृंदाचे सहकार्य लाभले.