मार्गदर्शन करतांना सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम |
मार्गदर्शन करतांना डॉ. सुनिता काळे |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या गृह विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘गृह विज्ञान आपल्या दारी, कुटूंबाचे कल्याण करी’ या अभियानांतर्गत दुस-या फेरीमध्ये दि 30 नोव्हेबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील मौजे करंजाळा, बाराशिव व जवळाबाजार येथे कार्यक्रम घेण्यात आले. सहयोगी अधिष्ठाता प्रा. विशाला पटनम यांनी ‘शालेय विद्यार्थ्यांना पंच ज्ञानेद्रियांच्या वापरातुन उच्च शालेय संपादणुक’, ‘कौटुबिक आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ व ‘माता – बाल मृत्युदर कमी करण्यासाठी कुटुंबाची जबाबदारी’ या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. तर बाराशिव येथील निवासी शाळात प्रा. विजया नलवडे यांनी ‘गृह विज्ञानाचे शिक्षण’, ‘उत्तम पोषण उत्तम आरोग्य – हीच खरी कुटुंबाची दौलत’ आणि ‘आहार कसा असावा’ याविषयी विद्यार्थींनींना माहिती दिली. जवळाबाजार येथे डॉ. सुनिता काळे यांनी ‘कौटुंबिक उत्पन्नास लावण्या हातभार – गृहिणींनो करा लघु उद्योगाचा स्वीकार’ या विषयावर गृहीणीशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या शेवटी
तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनावर आधारित प्रश्न मंजुषा घेवून अचुक उत्तरे
देणा-या लाभार्थ्यांना ‘उत्कृष्ट श्रोता पुरस्कार’ देण्यात आले. या निवडक गावांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन संशोधन
सहयोगी रेश्मा शेख, ज्योत्स्ना नेर्लेकर, मंजुषा रेवणवार, रुपाली पतंगे,
अर्चना भोयर आणि शितल राठोड यांनी केले. तसेच गृह विज्ञान विषयक तंत्रज्ञानाचा
प्रसार केला. या कार्यक्रमामध्ये गृह विज्ञान महाविद्यालय निर्मीत कुटुंबयोगी
पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री केली. कार्यक्रमांना महिला, विद्यार्थी तसेच
ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.