Saturday, December 7, 2013

जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या रोगाच्या प्रतिबंधासाठी आहार यावर डॉ रिता रघुवंशी यांचे व्याख्यान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात जीवनशैलीमुळे निर्माण होणा-या रोगाच्‍या प्रतिबंधासाठी आहारयाविषयावर पंतनगर येथील जे बी पंत कृषि व तंत्रत्रान विद्यापीठांर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या अधिष्‍ठाता डॉ रिता रघुवंशी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन दि 11 डिसेंबर 2013 बुधवार सकाळी 10.30 वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे राहणार असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. व्‍याख्‍यानास विद्यार्थी, प्राध्‍यापकवृंद व कर्मचारीवृंदानी मोठया संख्‍येने उपस्थित राहण्‍याचे आवाहन गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्या प्रा विशाला पटणम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ डि बी देवसरकर यांनी केले आहे.