Monday, December 9, 2013

हिंगोली जिल्‍हातील मौजे हटटा, बोरी सावंत व आडगांव येथे ‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, ........

मार्गदर्शन करतांना डॉ विजया नलवडे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या गृह विज्ञान महाविद्यालयातर्फे ‘गृह विज्ञान आपल्‍या दारी, कुटूंबाचे कल्‍याण करी’ या अभियानांतर्गत तिर-या फेरीमध्‍ये दि 7 डिसेंबर रोजी हिंगोली जिल्‍ह्यातील मौजे हटटा, बोरी सावंत व आडगांव येथे कार्यक्रम घेण्‍यात आले. मौजे हटटा येथे डॉ विजया नलवडे यांनी ‘गृह विज्ञानाचे शिक्षण’, तर डॉ फरजाना फारोखी यांनी ‘उत्‍तम पोषण उत्‍तम आरोग्‍य – हीच खरी कुटुंबाची दौलत’ याविषयावर तर डॉ जयश्री रोडगे यांनी ‘कौटुंबिक उत्‍पन्‍नास लावण्‍या हातभार – गृहिणींनो करा लघुउघोगाचा स्‍वीकार’ याविषयी इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमातुन उपयुक्‍त मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाच्‍या शेवटी तज्ञांनी केलेल्‍या मार्गदर्शनावर आधारित प्रश्‍न मंजुषा घेवून अचुक उत्‍तरे देणा-या लाभार्थ्‍यांना ‘उत्‍कृष्‍ट श्रोता पुरस्‍कार’ देण्‍यात आले. या निवडक गावांमध्‍ये कार्यक्रमाचे आयोजन संशोधन सहयोगी अर्चना भोयर, रुपाली पतंगे, शितल राठोड यांनी केले. कार्यक्रमात गृह विज्ञान महाविद्यालय निर्मीत कुटुंबयोगी पुस्‍तकांचे प्रदर्शन व विक्री केली. कार्यक्रमांना महिला, विद्यार्थी तसेच ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.