Saturday, February 8, 2014

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथुन ‘कृषि वसंत - 2014’ चे थेट प्रसारण

       नागपुर येथे देशातील सर्वात मोठे राष्‍ट्रीय कृषि प्रदर्शन कृषी वसंत – 2014 चे आयोजन दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन यात देशभरातील कृषी संशोधन संस्‍था, कृषि विद्यापीठे, कृषी क्षेत्रातील खाजगी संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍था आदींचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन देशाचे राष्‍ट्रपती मा प्रणव मुखर्जी यांच्‍या हस्‍ते दि 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. शेतकरी बांधवांसाठी हे प्रदर्शन अतिशय महत्‍वाचे ठरणार असुन यात साधारणता 3 ते 5 लाख शेतकरी, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक भेट शक्‍यता आहे.    
     या प्रदर्शनास ज्‍या शेतक-यांना प्रत्‍यक्ष उपस्थितीत राहता येणार नाही त्‍यांच्‍या करीता प्रदर्शनाचे वेबकास्टिंगव्‍दारे जिल्‍हा व तालुकास्‍तरावर राज्‍यभर प्रसारण करण्‍यात येणार आहे. त्‍यादृष्‍टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ही कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली वेबकास्टिंगव्‍दारे कृषि वसंत प्रदर्शनाचे थेट प्रसारणाचे नियोजन करण्‍यात आले असुन दि 9 ते 13 फेब्रुवारी दरम्‍यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात शेतकरी बांधवांनी याचा लाभ द्यावा असे आवाहन व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे व श्री दयानंद दिक्षीत यांनी केले आहे. अधिक माहीती साठी 02452-229000 या दुरध्‍वनी क्रमांकावर संर्पक साधावा.      
       तसेच प्रत्‍येक जिल्‍हाच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी आत्‍माचे प्रकल्‍प संचालक व कृषि उपसंचालक यांच्‍या माध्‍यमातुन विविध ठिकाणी प्रदर्शानाचे थेट प्रसारण करण्‍याचे नियोजन असुन वेबकास्‍टींगाचा कार्यक्रम http://agriwebcast.gov.in यासंकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.