Sunday, May 18, 2014

महाराष्‍ट्रातील शेतक-यांमध्‍ये उद्योजकता विकास होणे आवश्‍यक ....... मा. डॉ. एस. ए. पाटील

खरीप शेतकरी मेळावास शेतकरी बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍याची सुरूवात दिपप्रज्‍वलन करून करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील, कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु, मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री विजयरावजी कोलतेविस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणशिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. का. वि. पागीरे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर, प्रगतशील श्‍ेातकरी सुर्यकांतराव देशमुख आदी. 
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍यानिमित्‍त विद्यापीठाचे बियाणे विक्रीचे उदघाटन करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील, कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु, मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आदी.
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍यानिमित्‍त कृषि प्रदर्शनाचे उदघाटन करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील, कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु, मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणकुलसचिव श्री. का. वि. पागीरे, डॉ राकेश आहीरे, प्रा दिलीप मोरे, प्रा पी एस चव्‍हाण आदी
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु, मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणशिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर आदी
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, व्‍यासपीठावर भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील, कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु,  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणशिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर आदी.
वनामकृवित आयो‍जीत खरीप पीक श्‍ेातकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक मा. डॉ. एस. ए. पाटील,  मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवणशिक्षण संचालक डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर,  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर आदी
**********************************************
शेतक-यांनी विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, तंत्रज्ञानाच्‍या जोरावरच शेतक-यांची प्रगती झालेली आहे, महाराष्‍ट्रातील शेतक-यांमध्‍ये उद्योजकता विकास होणे आवश्‍यक असुन शेतीमध्‍ये अधिक गुंतवणुक करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी संचालक तथा धारवाड (कर्नाटक) येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. ए. पाटील यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४२ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.
मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु होते तर विशेष अतिथी म्‍हणुन जालना येथील मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे यांची उपस्थिती होती. तर कृषि परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री विजयरावजी कोलते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री. का. वि. पागीरे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. साहेबराव दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
     मा. डॉ. एस. ए. पाटील पुढे म्‍हणाले की, जगाचा पोशींदा असलेल्‍या शेतक-यांची परिस्थिती बिकट असुन आपल्‍या शेतीधोरणात बदल करावे लागतील. शेतकरी आपल्‍या हुशार मुलांना वैद्यकीय व अभियांत्रीकी शिक्षण देण्‍यास प्राधान्‍य देतात परंतु आज शेतीला हुशार मनुष्‍यबळाची गरज आहे. इस्‍त्राईलमध्‍ये कमी पाऊस पडतो परंतु तंत्रज्ञानाच्‍या जोरावर आपल्‍यापेक्षा अनेक पटीने शेती उत्‍पादनात पुढे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. 
    अध्‍यक्षीय भाषणात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील शेती कोरडवाहु शेती असुन पाण्‍याचा वापर शास्‍त्रीय पध्‍दतीने करणे आवश्‍यक आहे. विहीर पुर्नभरण व शेततळे या सोबतच शेतक-यांसमोर मजुरांच्‍या टंचाईचा मोठा प्रश्‍न असुन त्‍यासाठी यांत्रीकीकरणावर भर द्यावा लागणार आहे. यावर्षी पाऊस सरासरी इतकाच पडण्‍याचा अंदाज आहे, परंतु तो असमान पडण्‍याची शक्‍यता दर्शविण्‍यात आली आहे. विद्यापीठाच्‍या बियाणास शेतक-यांमध्‍ये असलेली मागणी पाहता, यावर्षी विद्यापीठ पुर्णक्षमतेने बिजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेईल, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.
    जालना येथील मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त मा. श्री. विजयअण्‍णा बोराडे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्या‍पीठाचे नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असे केल्‍यानंतर हा पहिलाच शेतकरी मेळावा असुन यामुळे विद्यापीठाची उंची वाढणार आहे. हवामान बदलामुळे शेतीपुढे मोठे प्रश्‍न निर्माण झाले असुन हे सोडविण्‍यासाठी विद्यापीठ निश्‍चीतच प्रयत्‍न करील. या विषयाचा गाड अभ्‍यासक असलेले राष्‍ट्रीय पातळीवरील शास्‍त्रज्ञ कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍याकडे विद्यापीठाची धुरा आहे, याचा निश्‍चीतच फायदा मराठवाड्यातील शेतक-यांना होईल. हवामान बदलाच्‍या परिस्थितीत रेशीमउद्योग व फुलशेती ही छोट्या शेतक-यांना अत्‍यंत उपयोगी आहे. विद्यापीठाने विविध पिकांची अनेक वाणे शेतक-यांना दिली, यापुढे अवर्षणात तग धरणारे पिकांचे वाण विद्यापीठाला विकसीत करावे लागतील. विद्यापीठाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्‍वावर शेतक-यांना विद्यापीठाची जमीन कसण्‍यासाठी द्यावी. आज जग शेतीला प्रतिष्‍ठा देत असुन शेतीची प्रतिष्‍ठा कधीही कमी होणार नाही. शेतीचा कारभार महिलांकडे दिल्‍यास त्‍या सक्षमपणे ही जबाबदारी पेलू शकतात, असे विचार त्‍यांनी मांडले.
   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर यांनी आपल्‍या भाषणात  शेतक-यांनी सोयाबीनची उगवणक्षमता तपासुन घरच्‍या घरी बियाण्‍याचा वापर करण्‍याचा सल्‍ला दिला. कार्याक्रमाचे प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. राकेश अहिरे यांनी केले.
तांत्रिक सत्रात विविध खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, किडी व रोग व्‍यवस्‍थापन, कोरडवाहु शेती व्‍यवस्‍थापन, एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, शेतीचे यांत्रिकीकरण, शेततळे, तण नियंत्रण आदी विषयावर विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञ डॉ बी बी भोसले, डॉ के एस बेग, डॉ काळपांडे, डॉ पडागळे आदींनी शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान केले. तांत्रीक सत्राचे सूत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी केले.
मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या वतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन २०१२ मधील मराठवाडा विभागातील महाराष्‍ट्र शासन कृषि पुरस्‍कार प्राप्‍त प्रगतशील शेतकरी बांधव व भगीनींचा सत्‍कार करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञानावर आधारीत विविध प्रकाशनाचे व श्‍ेातीभाती मासिकाचे विमोचन यावेळी करण्‍यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीतील दालनास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यापीठ विकसित विविध पिकांचे बियाणे विक्रीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मेळाव्‍यास राज्‍यातील शेतकरी बांधव, कृषि उद्योजक मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वीतेसाठी विद्यापीठ अशिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी इत्‍यादीनी परिश्रम घेतले.
                               श्‍ेातीभाती मासिकाचे विमोचन 
मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या वतीने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन 2012 मधील नळदुर्गा येथील महाराष्‍ट्र शासनाचा जिजामाता कृषिभुषण पुरस्‍कार प्राप्‍त महिला शेतकरी सौ. अनुपमा कुलकर्णी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
प्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण