वनामकृविचे
शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि)
डॉ विश्वास शिंदे यांना सेवानिवृत्ती निमित्त
निरोप
****************************************
परभणी
: जीवन हे सरळ रेषा नसुन जीवनात अनेक वळणे आहेत, अनेक अडचणी येत असतात पंरतु व्यक्तींने
आपल्या ध्येयापासुन विचलीत होऊ नये, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि)
डॉ विश्वास शिंदे दि ३१ जूलै रोजी निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा
विद्यापीठाच्या वतीने आयोजित निरोप समारंभाच्या
प्रसंगी ते बोलत होते. या निरोप संमारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु
हे होते तर नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर व नुतन विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची व्यासपीठावर प्रमुख
उपस्थिती होती.
अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, विद्यापीठातील प्रत्येक
व्यक्तींने आपले कर्तव्य व भुमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. डॉ विश्वास शिंदे
यांनी आपल्या विद्यापीठाच्या प्रदिर्घ सेवा काळात अनेक अडचणीत धैर्याने कार्य
केले म्हणुन ते आज समाधानाने निवृत्त होत आहेत. त्यांच्या काळात देशपातळीवर शैक्षणिक
क्षेत्रात विद्यापीठाने मोठे कार्य केले आहे, असे गौरवौदगार डॉ विश्वास शिंदे यांच्याबाबत
कुलगूरू मा बी व्यंकटेश्वरलू यांनी काढले.
सत्काराला
उत्तर देतांना निवृत्त शिक्षण संचालक व अधिष्ठाता (कृषि)
डॉ
विश्वास शिंदे म्हणाले की, विविध पदावर विद्यापीठाची सेवा करण्याची संधी प्राप्त
झाली हे माझे भाग्य समजतो, सर्वांच्या सहकार्यानी विद्यापीठाच्या सेवेतील ३४ वर्ष यशस्वीपुर्ण करू शकलो. विद्यापीठातील अनेक पदे रिक्त असतांना विशेषता कृषि संशोधन
व शिक्षण क्षेत्रात मोठे काम करता आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ जयश्री ऐकाळे यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे
यांनी केले.
याप्रसंगी
नुतन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता कृषि डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद
वासकर, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रा. दिलीप मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त
केले.
कार्यक्रमास
विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ विश्वास शिंदे यांचा कार्याचा अल्पसा
परिचय
डॉ विश्वास शिंदे यांनी नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेतुन कृषि विद्या शाखेतुन आचार्य पदवी
पुर्ण करून विद्यापीठाच्या सेवेत विविध पदावर 34 वर्ष कार्य केले. यात कृषि
अधिकारी म्हणुन नौकरीला सुरवात करून सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,
प्राध्यापक, कृषि विद्या शाखाचे विभाग प्रमुख तसेच अन्न तंत्रज्ञान
महाविद्यालयचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य म्हणुन कार्य केले. गेल्या चार
वर्षापासुन ते विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता कृषि म्हणुन कार्यरत
होते. या काळात विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील कनिष्ठ
संशोधन शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. डॉ विश्वास शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील अनुभव आधारीत शिक्षणास पध्दतीचे अनेक
प्रकल्प सुरू करण्यात आले. त्यांची आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय
पातळीवर अनेक शोध निबंधे, मराठी लेख व पुस्तके प्रसिध्द
केलेले आहेत. पीक लागवड तंत्रज्ञान, पीक पध्दती, कोरडवाहु
शेती व जल व्यवस्थापन यावरील उल्लेखनिय संशोधन केले आहे.