Friday, August 22, 2014

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्रास मोठा प्रतिसाद

मोसंबी बागायतदारांच्‍या प्रशिक्षण व चर्चासत्राचे उदघाटन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत आयोजित एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्रात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु मोसंबी बागायतदारांशी संवाद साधतांनायाप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष, डॉ आर ए मराठे, श्री यु आर घाटगे, मोसंबी आदी
******************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लिंबुवर्गीय फळपिकावर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत मोसंबी बागायतदारांच्‍या एक दिवशीय प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन दिनांक २० ऑगस्‍ट रोजी बदनापुर जि. जालना येथील मोसंबी संशोधन केंद्रात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नागपुर येथील राष्‍ट्रीय संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. डि के घोष व डॉ आर ए मराठे, जालना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री यु आर घाटगे, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी पाटील, टिएमसीचे प्रभारी अधिकारी डॉ एम बी सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु उदघाटनपर भाषणात म्‍हणाले की, राज्‍यातील शेतकरीच मोठा शास्‍त्रज्ञ असुन शेतक–यांचे शेतीतील अनुभव हे मोसंबी संशोधनाची दिशा ठरविण्‍यासाठी मार्गदर्शक ठरतील. हवामान बदलाचा मोसंबी बागेवरील परिणामावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनीही मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात डॉ उदय खोडके, डॉ एस पी जिंतुरकर, डॉ एम बी पाटील, डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, डॉ पि ए ठोंबरे, प्रा. कलालबंडी, प्रा एस एच जेधे यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू मा डाॅ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी मोसंबी बागायतदारांच्‍या विविध समस्‍या व अडचणी थेट संवाद साधत समजुन घेतल्‍या तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी त्‍यास उत्‍तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ एम बी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नंदकुमार भुते यांनी तर आभार प्रदर्शन डॉ डी के पाटील यांनी यांनी केले. कार्यक्रमास जालना व औरंगाबाद जिल्‍हयातील 200 पेक्षा जास्‍त मोसंबी बागायतदार उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करण्‍यात आले. ही मोहिम दि 20 ऑगस्‍ट ते 20 सप्‍टेंबर दरम्‍यान औरंगाबाद व जालना जिल्‍हात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्रामार्फत राबविण्‍यात येणार आहे.

चर्चासत्रात शेतकरी – शास्‍त्रज्ञ यांच्‍यातील ठळक मुदयावर चर्चा होऊन पुढील शिफारशी करण्‍यात आल्‍या
1. माती परिक्षण करूनच मोसंबी लागवड करण्‍यात यावी.
2. मोसंबीची 6 बाय 6 मीटर आतंरावरच लागवड करावी.
3. रंगपुर खुंटाचा वापर करूनच न्‍युसेलर मोसंबीची रोपे तयार करावी.
4. सेंद्रिय खते व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचा वापर करावा.
5. ठिबंक सिंचनाच्‍या वापर करून पाण्‍याचे नियोजन करावे.
6. शेतक-यांनी स्‍वतं:च मातृवृक्षबागा तयार करून पुरक व्‍यवसाय निर्माण करावा.

विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी कार्यक्रमांतर्गत विशेष पीक संरक्षण मोहिमेचे उदघाटन करतांना 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अघिष्‍ठाता डॉ अशोक ढवण
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर