अनुभवातुन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी व विद्यार्थी पालक मेळावा
उत्साहात संपन्न
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBCUnmWsukD6Cqs_uh45tIY4BExjrC7HH6eqwZivwXxSulD3hAtPGfGGlpeBc5Y3hBnXAUegUDPIQZ8tfST1OwjfJBNgY5opO8aEpmFwNAPb-MK8UoKcUhZ4aLWDkS0t3vuhN9URfRs4o/s1600/DSC_3208.JPG) |
कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhIwsUhm255lY1v91sTZE6dMdZebJE4NK6uWtaS7Bt_vaTaj1NTtqnK8HpvkXRMUVPLp9dGBxuxfX0IbdVmxDoPpsBItqFPnk03_DfqQdg5a-p8XKLFFtN5Rfm6x_OwTqc01DrFHb3MU8s/s1600/DSC_3289.JPG) |
मेळाव्यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्वरलु, व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवन, श्री सुर्यकांतराव देशमुख, श्रीमती मंगलाताई जाधव, प्राचार्य डॉ डी एन गोखले, प्रा किरण सोनटक्के, श्री एकनाथराव साळवे, श्री साहेबराव दिवेकर आदी |
************************
शेतमाल प्रक्रिया उद्योगात
मोठया संधी असुन कृषि पदवीधरांनी नौकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात उतरावे
व शेतक-यांसाठी कार्य करावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी केले. विस्तार शिक्षण
संचालनालय व कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास
योजना व अनुभवातुन शिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी व विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन दि २३ मार्च रोजी करण्यात
आले होते, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, प्रगतशील शेतकरी श्री सुर्यकांतराव
झरीकर, महिला उद्योजीका श्रीमती मंगलाताई जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ डि एन गोखले, सहयोगी अधिष्ठाता (निम्नस्तर शिक्षण) डॉ डि बी देवसरकर, सह्योगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता
प्रा पी एन सत्वधर यांची प्रमुख उपस्थिती होती.कुलगुरू
मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांत उद्योजकता विकासासाठी कृषि उद्योजक व कृषी
पदवीधर यांच्यात याप्रकारे संवाद होणे गरजेचे आहे. विद्यापीठ मुख्यत: सर्वसाधारण
शेतक-यांना डोळयासमोर ठेऊन कार्य करते, विद्यापीठाकडुन
शेतक-यांच्या त्याच्या परिस्थितीनुसार विविध प्रकारच्या मोठया अपेक्षा आहेत.
जगात अनेक प्रकारचे आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध असुन विद्यपीठ शास्त्रज्ञांनी
शेतक-यांना अनुकूल तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याबाबत मार्गदर्शन करावे.कृषि
विद्यापीठ हे अधिकारी निर्मितीपुरते मर्यादित न रहाता, कृषि
उद्योजक निर्मितीचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली तर शेतक-यांनी शेतीला उद्योग
समजुन व्यवसाय करावा असे मत प्रगतशील शेतकरी श्री सुर्यकांतराव देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले.
विद्यार्थ्यां ध्येय निश्चित करून इच्छाशक्तीच्या जोरावर कोणत्याही
क्षेत्रात यश संपादन करू शकतात असे प्रतिपादन श्री साहेबराव दिवेकर यांनी केले तर
विद्यापीठातील पशुधनांचा गुणात्मक दर्जां वाढत असुन मराठवाडयातील पशुपालकांना
याचा लाभ होत असल्याचे मत प्रगतशील शेतकरी एकनाथराव साळवे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी
महिला उद्योजीका श्रीमती मंगलाताई जाधव, दुग्ध व्यवसाय उद्योजक प्रा
किरण सोनटक्के, फळप्रक्रिया उद्योजक महम्मद गौस, प्रतापराव लाड, सुरेद्र रोडगे, गोपालराव मुदंडा, माणिकराव दहे, रमेश रणदिवे यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहयोगी
अधिष्ठाता डॉ डि एन गोखले यांनी कृषि महाविद्यालयात राबविण्यात येत आलेल्या
विविध विभागातील अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाची माहिती देतांना सांगितले की,
या माध्यमातुन विद्यार्थ्यांत कृषी उद्योगकता गुणाचा विकास होण्यास
मदत होत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा एस एल बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन
विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यी
प्रविंद्रकुमार, दिगांबर हरकळ, शारदा
घोलप, प्रविण तिडके, कुमारी सोनी,
चैताली चव्हाण, प्रियांका आठवले यांनी
अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमात अवगत केलेल्या कौशल्याबाबत मनोगतात माहिती दिली.
मेळाव्याप्रसंगी कृषी प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते, त्यात कृषि महाविद्यालयातील आठव्या सत्रातील अनुभवातुन शिक्षण
कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन मांडण्यात
आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभवातुन शिक्षण
कार्यक्रमाचे प्रभारी डॉ के टी आपेट, डॉ पी बी लटपटे,
डॉ ए टी शिंदे, डॉ शिवाजी शिंदे, डॉ पी के वाघमारे, डॉ अनिल धमक यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास
शेतकरी, विद्यार्थी-पालक
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxZNwnBbEl6kwPCgNnNcrgxeBJurtuT2Qfh4o8wYN68a2NRFh0ujnvhhXftk_MWbnsZm1Z0oR-mketOCEUf8T_6z940UK84E3pcQAfOQ4hv4JW-o7VKOeFxRFHLQ5P1iC1dY6NEzg6k7s/s1600/DSC_3234.JPG)
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7lgv-qIeIroBVpP8C5GnCi6rbA9usaQBftQMjAnXyldJYhLsKwI195jpgNacY8V-hWblK58trfF0ho1YK72fsHsQDN4J1bAc2NUVGNiKgWdZscdsROzEQbv8UlepbMmpCzs8HHBKrc3E/s1600/DSC_3212.JPG) |
कृषी प्रदर्शनीची पाहणी करतांना |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvX4nYzHJgeuE3mECb0MmaoiibXjZY0S-pNatkEOSBuSxIB63UB3v1jYcmxD6oeDV3Lgr162-N5ZmQXcY2h-_OaYojScrNYXiMfJywrLR7FWu8G0jIFEzH7ZzjyUJgXZbOgLmaIG4MHdU/s1600/DSC_3286.JPG) |
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवन |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghqGMHy49V4fsLqJ22oyCm8eU-HzoZjb3Vq6fR8Q11nn6m5kzmXfqR-HwxX7Y2SnmIfVlJdVpF-guH4UmXkh3err1DN0DI9jiByWjsj7QlgQhRxDtORGkaAv7aPzKBIjJG0xKGmw6fksU/s1600/DSC_3279.JPG) |
मार्गदर्शन करतांना श्री सुर्यकांतराव देशमुख |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhee1fZGjIJMJs_SqxVYFFRxx2EJJISDCsIkkRLUsDqT5moTgLkurQNPezS5LypjlLtIB1ipv8NwnMQIRbXU8F_01Gg_PLqsM0lW9DrCiIOgtOOCYbY7_Atc3G4HMxZplg5_HN8o8_9Lec/s1600/DSC_3252.JPG) |
प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ डी एन गोखले |