Wednesday, December 2, 2015

वनामकृवित अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालय व म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे (फीस्‍ट २०१५) आयोजन करण्‍यात आले असुन म्‍हैसुर केंद्रिय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्‍था (सिएफटीआरआय) व डिफेन्‍स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक आहे. परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले आहे.दोन दिवस चालणा-या परिषदेच्‍या तांत्रिक सत्रात हळद प्रक्रिया उद्योग, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, बेकरी व्‍यवस्‍थापन उद्योग, कडधान्‍य प्रक्रिया उद्योग, शेळीपालन व्‍यवसाय, रेशीम उद्योग व्‍यवसाय, आधुनिक उद्यानविद्या तंत्रज्ञान आदी विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असुन अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीत साधारणत: शंभर दालनाचा समावेश राहणार आहे. या प्रदर्शनीत कृषि प्रक्रियाशी संबंधीत अत्‍या‍धुनिक सयंत्रे व तंत्रज्ञानावर आधारित प्रात्‍यक्षिकांचे सादरीकरण करण्‍यात येणार असुन शेतक-यांच्‍या प्रगतीसाठी कौशल्‍य व उद्योजकता विकास, संस्‍कारयुक्‍त अन्‍न व ग्राहकांची सुरक्षा, भारतीय अन्‍नपदार्थाकरिता कृषि प्रक्रिया व तंत्रज्ञान विकास, पारंपारिक अन्‍न व कुपोषण, देशांतर्गत बाजारपेठेसाठी पुरवठा शितकरण साखळी व साठवणुक यावर परिषदेत विशेष भर देण्‍यात येणार आहे. सदरिल परिषदेत शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, विद्यार्थी, कारखानदार, लघुउद्योजक व शासकीय अधिकारी नोंदणी करून सहभाग घेऊ शकतात. तसेच प्रदर्शनीचा लाभ शेतकरी बांधव, ग्रामीण महिला, युवक, बचत गटाच्‍या महिलांनी घ्‍यावा, असे आवाहन आयोजकाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.  ‘मेक इन इंडिया या माननीय पंतप्रधानाच्‍या संकल्‍पनेनुसार कृषि प्रक्रिया क्षेत्राकरिता पुर्नबांधणी करणे आवश्‍यक असुन जागतिक बाजारपेठातील संधीची भारतीय अन्‍नप्रक्रिया उद्योजकांना शाश्‍वती प्राप्‍त होण्‍याच्‍या दृष्‍टीने या परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. आपल्‍या बहुसांस्‍कृतिक देशांत विविध प्रकाराची अनेक पारंपारिक अन्‍नपदार्थ तयार केली जातात. यापैकी बरेच अन्‍नपदार्थ पोषणमुल्‍यात स्‍वयंपुर्ण असल्‍यामुळे कुपोषणासारख्‍या बाबींवर मात करण्‍यात येऊ शकते. तथापि, या अन्‍नपदार्थांच्‍या व्‍यापारी तत्‍वावर निर्मीती करण्‍यासाठी यांत्रिकीकरणाची सुविधा उपलब्‍ध नसल्‍यामुळे अडचण निर्माण होते. कांही पारंपारिक अन्‍नपदार्थाची पाककृती वापरून जागतिकस्‍तरावरील बाजारपेठेत उपलब्‍ध आहे, परंतु अद्यापही भारतीय पाककलेतील काही अन्‍नपदार्थाचे मोठया प्रमाणात निर्मिती करून उपयोगात आणल्या गेले नाहीत. देशात अन्‍नसुरक्षा व प्रमाणके कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्‍यामुळे अन्‍नप्रक्रिया उद्योजकांना अन्‍नपदार्थाची प्रत व सुरक्षेचे पुर्नमुल्‍यमापन करणे आवश्‍यक झालेले आहे. बहुराष्‍ट्रीय अन्‍नप्रक्रिया उद्योगांना भारतीय पारंपारिक अन्‍नपदार्थांच्‍या व्‍यापारी तत्‍वावर निर्मिती करतांना शास्‍त्रीय अभ्‍यासांचा आधार घेऊन त्‍यातील आरोग्‍यदायक घटकांचा फायद्याचा विचार करण्‍यात यावा. तसेच शेतक-यांना त्‍यांच्‍या आर्थिक विकासाकरिता त्‍यांच्‍यातील उद्योजकतेला प्रोत्‍साहन देणे गरजेचे आहे. या सर्व पार्श्‍वभुमीवर सदरिल परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे.





XXIV Indian Convention of Food Scientists and Technologists (ICFOST-2015)

College of Food Technology, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani in collaboration with Association of Food Scientists and Food Technologists – AFST(I), Mysore is organising National level Indian Convention of Food Scientists and Technologists (ICFOST) on 18th and 19th December at Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani This programme is being co-sponsored by Central Food Technology Research Institute (CFTRI), Mysore and Deference Food Research Laboratory (DFRL), Mysore.
The focal theme of programme is “Farmers Empowerment through Agro-processing and Sustainable Technologies - FEAST". The theme of Conference is chosen in view of present situation of farmers of country and is an effort in line with Prime Minister's vision of empowering farmers for prosperous India and for Make in India, the agro processing sector also needs refueling so as to sustain in global market by Indian food processors.
The place of conference is rural area with rain fed agriculture practices and there is need and scope for agro-processing of the local produce wherein the entrepreneurship development using the convenient technologies showcased in the conference through exhibition and deliberations by eminent speakers and budding researchers will support the cause.
It is envisaged that FEAST-2015 is expected to generate new hope in the upcoming farmers to look for additional resources through collaborative entrepreneurship by opting post-harvest processing technologies or collective marketing of the agriculture produce.
During this national programme, FoodExpo (Food Processing Exhibition) is also being organized for the farmers and entrepreneurs to get acquainted with major area of Food Processing. Food Expo will include show case of food processing machineries, instruments, ingredients, processed foods, institutions and publishers which will help and motivate the budding entrepreneurs and farmers to initiate their own food and agro-processing business.

Dr. B. Venkateswarlu, Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani appealed the farmers, self help groups, entrepreneurs, professionals, academicians and student to participate in this event and get benefited.