वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कुशल व अकुशल कर्मचा-यांच्या कायमस्वरूपी
पदावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्पयात असुन अद्याप कुठल्याही कर्मचा-यास नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. श्री. नागोराव सखाराम पांचाळ
यांना द्यावयाच्या नियुक्तीच्या प्रक्रियेपासुन वगळण्यात आलेले नाही. तसेच
श्री. पांचाळ यांचे नाव जेष्ठता सुची मध्ये पुर्वीपासुनच आहे, त्यामुळे जेष्ठता
सुचीमध्ये नाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. श्री. पांचाळ यांना कुलसचिव
कार्यालयाने याबाबत यापुर्वीच सर्व माहिती दिलेली आहे. श्री. पांचाळ यांना
विद्यापीठाच्या कुठल्याही
अधिकारी व कर्मचा-यांनी पैसे मागितले नाहीत. तथापि त्यांनी १४ डिसेंबर २०१५ पासुन
त्यांच्या वर झालेल्या कथित अन्यायाविरूध्द विद्यापीठ गेट समोर उपोषण सुरू
केले होते. प्रशासनाने त्याच्या उपोषणाची दखल घेऊन उपोषणापासुन परावृत्त्व्हावे
असे श्री. पांचाळ यांना कळविले होते, परंतु दिनांक १५ डिसेंबर २०१५ रोजी श्री.
पांचाळ यांनी विद्यापीठास कोणतीही पुर्व सुचना न देता आत्मदहनाचा आततायीपणा केलेला आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव यांनी निवेदनाव्दारे कळविले आहे.