वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांना कृषि
शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रातील कार्याबाबत संजीवनी कृषि पुरस्काराने दिनांक
५ डिसेंबर रोजी संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष
मा ना श्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी
समाजकल्याण राज्यमंत्री मा ना श्री दिलीप कांबळे, आमदार मा श्री मोहनराव फड,
शिक्षण सभापती मा श्री दादासाहेब टेंगसे, आयोजक श्री आनंद भरोसे, कृषिभुषण श्री
कांतराव देशमुख, माजी आमदार श्री विजयराव गव्हाणे, गंगाधरराव पवार आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
डॉ ठोंबरे यांनी विविध शेतकरी मेळावे, कृषि
प्रदर्शने, प्रशिक्षण, आकाशवाणी व दुरदर्शन आदी माध्यमातुन शेतक-यांना पशुसंवर्धन
व दुग्धव्यवसाय बाबत जनजागृती व मार्गदर्शनाचे कार्य केले असुन त्यांनी अनेक
पुस्तके, संशोधन लेखे, घडी पत्रीकांचे लिखान केले आहे. ते सतत भ्रमणध्वनी व गटचर्चाव्दारे
मराठवाडातील शेतकरी व पशुपालकाच्या संपर्कात राहुन त्यांना मार्गदर्शन करीत असतात.
त्यांनी मुख्य संशोधन मार्गदर्शक म्हणुन अनेक पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या पुरस्काराबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा
डॉ बी व्यंकटेश्वरलु, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्राचार्य डॉ डि एन गोखले
आदींनी अभिनंदन केले.