वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत असलेले सहयोगी प्राध्यापक
(विस्तार शिक्षण) डॉ. राजेश परभतराव कदम यांना अग्रोकेअर कृषी मंच, महाराष्ट्र
कृषी तंत्रज्ञान विस्तार प्रा. लि. व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त
विद्यमाने दि २४ डिसेंबर रोजी आयोजित कसमादे कृषी महोत्सव-२०१५ मध्ये सातवा
राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्काराने सन्मामित करण्यात आले. सटाना, जि नासिक येथील कसमादे कृषी महोत्सवात एका भव्य कार्यक्रमात वनाधिपती मा. श्री. विनायकदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी आमदार मा. श्री. राहुलजी आहिरे, आदर्श गांव योजनेचे प्रणेते मा. पोपटराव पवार, विभागीय कृषी सह संचालक मा. श्री. मोते, मा. श्री भूषण निकम, मा. श्री नंदकिशोर शेवाळे, मा. श्री. डॉ. पाटील, प्राचार्य मा. डॉ. रसाळ, मा. श्री. जगताप, मा. डॉ. आहिरे आदींची प्रमुख उपस्थित होती.
स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे ह्या
पुरस्कारांचे स्वरूप असुन कृषी शिक्षण, कृषि विस्तार व ग्रामीण युवकांचा विकास या
क्षेत्रातील भरीव कामगिरीबाबत डॉ कदम यांना हा राज्यस्तरीय
अग्रोकेअर आयडॉल पुरस्कार
देण्यात आला. कृषी शिक्षणात नवनवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थाच्या
विकासात योगदान दिले, तसेच विविध तंत्रज्ञान प्रसाराच्या माध्यमातून नवीन कृषी
तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतक-यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले.
गरजेवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन करून त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा व
शेतक-यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी डॉ कदम प्रयत्न केले. सदरील कामाचे दखल घेऊन
अग्रोकेअर
कृषी मंच, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान विस्तार प्रा. लि. यांनी श्री भूषण निकम
यांच्या अध्यक्षतेखाली ल श्री नंदकिशोर शेवाळे व इतर जेष्ठ तज्ञ सदस्याचा समावेश असलेल्या समितीने डॉ.
प्रा. राजेश कदम यांची सातवा राज्यस्तरीय अग्रोकेअर आयडॉल पुरस्कार-२०१५ या पुरस्कारासाठी निवड केली.
या पुरस्काराबाबत डॉ. प्रा. राजेश कदम यांचे गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, डॉ. राकेश आहिरे, डॉ.
प्रशांत देशमुख, डॉ. सुनील उमाटे, डॉ. जयश्री एकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण
कापसे, प्रा. प्रल्हाद चव्हाण, डॉ. गजानन भालेराव, डॉ. दिलीप झटे, डॉ विनोद शिंदे
व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले आहे.