नागपूर येथे
केंद्रीय लीम्बुवर्गीय फळे संशोधन संस्थेत २८ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान राष्ट्रीय
परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास
पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. हरिहर कौसडीकर व आचार्य पदवी विद्यार्थी आश्विन चेके
यांनी भित्तीपत्राकाव्दारे सादर केलेल्या "मुळाच्या सानिध्यातील मातीच्या
संकरणाचा मोसंबी झाडावर होणारा परिणाम" या विषयावरील शोधनिबंधास प्रथम
क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. याबाबत सर्वस्तरात विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.