Wednesday, December 2, 2015

आश्विन चेके, डॉ. पाटील व डॉ. कौसडीकर यांना शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार

नागपूर येथे केंद्रीय लीम्बुवर्गीय फळे संशोधन संस्थेत २८ ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. हरिहर कौसडीकर व आचार्य पदवी विद्यार्थी आश्विन चेके यांनी भित्तीपत्राकाव्‍दारे सादर केलेल्‍या "मुळाच्या सानिध्यातील मातीच्या संकरणाचा मोसंबी झाडावर होणारा परिणाम" या विषयावरील शोधनिबंधास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. याबाबत सर्वस्तरात विजेत्यांचे अभिनंदन होत आहे.