Thursday, December 3, 2015

वनामकृवि संघास क्रीडा महोत्‍सवात पथसंचलनात प्रथम क्रमांक

वनामकृविस सन २०१६ च्‍या विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे यजमानपद
विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाच्‍या यजमानपदाचे ध्‍वजाचे हस्‍तांतरण करतांना
नांदेड स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात १९ व्‍या राज्‍यस्‍तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सव स्‍पर्धा दिनांक २६ नोब्‍हेंबर ते १ डिसेंबर दरम्‍यान पार पडल्‍या. सदरिल स्‍पर्धेमध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कबड्डी, खो-खो, व्‍हॉलीबॉल, मैदानी स्‍पर्धा, बास्‍केटबॉल आदी संघानी सहभाग नोंदविला होता. स्‍पर्धे दरम्‍यान विद्यापीठाच्‍या खेळाडुंनी शिस्‍तीचे व नियमाचे पालन करून उत्‍कृष्‍ट पथसंचनल केले, त्‍या आधारे विद्यापीठाने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्‍त केला. या स्‍पर्धेत विद्यापीठाच्‍या मुलांच्‍या खो-खो व मुलींच्‍या व्‍हॉलीबॉल संघाने अनुक्रमे दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, नाशिक येथील महा‍राष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, औरंगाबादचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जळगांवचे उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्‍या संघास पराभुत करून दोन फे-यात विजय संपादन केला.
क्रीडा महोत्‍सवाच्‍या बक्षीस वितरण समारंभात सन २०१६ च्‍या विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे यजमानपदीची जबाबदारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास देण्‍यात आली असुन स्‍पर्धेचा ध्‍वज सन्‍मानाने विद्यापीठास हस्‍तांतरीत करण्‍यात आला. स्‍वामी रामांनद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ पंडित विद्यासागर, आमदार अमिताभाभी चव्‍हाण, स्‍वागताध्‍यक्ष डॉ प्रदिप देशमुख, राज्‍यपाल नियुक्‍त विविध समित्‍यांचे अध्‍यक्ष व सदस्‍य यांच्‍या हस्‍ते विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, डॉ आशा देशमुख, प्रा डी एफ राठोड, किशोर शिंदे यांना विद्यापीठाच्‍या वतीने स्‍पर्धेचा ध्‍वज स्‍वीकारला. विसाव्‍या क्रीडा महोत्‍सवाचे पुढिल वर्षी आयोजन व नियोजन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या अधिपत्‍याखाली व मार्गदर्शनाखाली करण्‍यात येणार असल्‍याचे विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.  
क्रीडा महोत्‍सवात पथसंचलनासाठी प्रथम क्रमांकाच्‍या चषकासह वनामकृविचा संघ