Monday, April 11, 2016

जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महीवाल यांनी केले गृह विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

गृह विज्ञान महाविद्यालयाच्‍या जिमखान्‍याच्‍या वतीने पदवी आणि पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना व्यक्‍तीमत्‍व विकासावर एक दिवसीय कार्यशाळेचे दि. ५ एप्रिल रोजी आयोजन करण्‍यात आले होते. परभणी जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुल रंजन महीवाल यांनी विद्यार्थ्‍यांना व्यक्‍तीमत्‍व विकासासाठी आणि स्‍पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्‍यांच्‍या विविध शंकाचे निरसन केले. कार्यशाळेत प्राचार्य प्रा. विशाला पटनम यांनी विद्यार्थ्‍यांना सदरिल मार्गदर्शनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिमखाना उपाध्‍यक्षा प्रा. सुनीता काळे यांनी केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यां मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.