Friday, April 15, 2016

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२ वी जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ पी. एन. सत्‍वधर, प्राचार्या प्रा विशाला पटणम, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यापीठ अभियंता डॉ ए एस कडाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन अडकिणे यांनी केले. विद्यापीठाच्‍या वतीने ढोलताश्‍याच्‍या गजरात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.