Monday, April 18, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची रौप्यमहोत्सवी जयंती उत्साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालय व वर्षा मुलींचे वसतीगृहात दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रौप्‍यमहोत्‍सवी जयंती साजरी करण्‍यात आली. याप्रसंगी गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्य प्रा. विशाला पटणम यांच्‍या हस्‍ते भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्‍यात आले. भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशाच्‍या जडणघडणीतील योगदान व घेतलेले कठोर परिश्रम याबाबत प्रा. विशाला पटणम यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनावर आधारीत डॉ. बी. आर. आंबेडकर हा चित्रपट उपस्थितांना दाखविण्‍यात आला. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. निता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्या‍र्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
टिप : सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त