Monday, October 10, 2016

वनामकृविच्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षा शुल्क माफीसाठी अनुदान मंजुर

महाराष्‍ट्र शासनाने पंचवीस लाख अनुदानास दिली मंजुरी
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील दुष्‍काळग्रस्‍त गावांतील शिक्षण घेत असलेल्‍या कृषीतंत्र विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षा शुल्‍कास माफीसाठी महाराष्‍ट्र शासनाने अनुदान मंजुर केले असल्‍याचे नुकतेच शासन निर्णयााव्‍दारे कळविले आहे. सन २०१६–१७ या आर्थिक वर्षात सन २०१५–१६ च्‍या रबी व खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी ५० पैश्‍यापेक्षा कमी असलेल्‍या गावांतील कृषीतंत्र विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांच्‍या परीक्षा शुल्‍कास माफीसाठी विद्यापीठास रूपये २५,२८,८०० (अक्षरी रूपये पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे केवळ) इतके अनुदान वितरीत करण्‍यास मंजुरी देण्‍यात आल्‍याचे विद्यापीठ प्रशासनास कळविले आहे.